शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाच्या निवड पद्धतीवरून संभ्रम

By admin | Updated: April 20, 2015 00:13 IST

निवडणुकीचे वेध : इचलकरंजीत इच्छुकांची चाचपणी सुरू

राजाराम पाटील - इचलकरंजी -नगरपालिका क्षेत्रात आगामी निवडणुकांचे वेध लागले असून, इचलकरंजीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी पडले आहे. नगरसेवकांची निवडणूक प्रत्येक प्रभागाला एक सदस्य या पद्धतीने होत असताना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची पद्धत निश्चित नसल्याने काहीशी संभ्रमावस्था आहे. मात्र, काही इच्छुकांनी चाचपणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक आणि नगराध्यक्षपदाची निवड हा विषय ऐरणीवर आला आहे.गेली ५० वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्या तरी सन १९९८-९९ पासून नगरपालिकांतील सदस्य व नगराध्यक्षपदासाठी आरक्षणे होऊ लागली. इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद प्रथमच अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. राजीव आवळे यांची १७ डिसेंबर १९९८ ला नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या कारकिर्दीला अठरा महिने होत असतानाच बदललेल्या राजकीय स्थितीमुळे राजीव आवळे यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाला आणि ५ आॅक्टोबर २००० रोजी संजय आवळे नगराध्यक्ष झाले.त्यानंतर नोव्हेंबर २००१ मध्ये झालेल्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इचलकरंजीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित झाले आणि नगराध्यक्षासाठी शहरातील सर्व मतदारांनी मतदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यावेळी कॉँग्रेसच्या किशोरी आवाडे या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या. पुढे नोव्हेंबर २००६ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत इचलकरंजीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण असे खुले झाले. त्यावेळी पुन्हा कॉँग्रेसचे बहुमत होऊन नगरसेवकांनी किशोरी आवाडे यांनाच नगराध्यक्षपदी निवडून दिले. पुढे बदललेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे आवाडे यांना नगराध्यक्षपदापासून दूर जावे लागले आणि २३ नोव्हेंबर २००९मध्ये मेघा चाळके या नगराध्यक्षा झाल्या.नोव्हेंबर २०११ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इचलकरंजीचे नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित झाले. या अडीच वर्षांत अनुक्रमे रत्नप्रभा भागवत, सुप्रिया गोंदकर, सुमन पोवार व बिस्मिल्ला मुजावर या चौघींना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. आता उर्वरित अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित आहे. त्याप्रमाणे सध्या शुभांगी बिरंजे या नगराध्यक्षा आहेत.२०१६ मध्ये होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इचलकरंजीचे नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांकरिता अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे.एका प्रभागातून एक नगरसेवक याप्रमाणे प्रभाग रचना करण्याचे काम शासन पातळीवर सुरू आहे; पण आगामी निवडणुकीमध्ये नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांतून होणार अथवा लोकनियुक्त नगराध्यक्षा असणार, याबाबत शासनाने कोणतेही निश्चित धोरण जाहीर केले नसल्याने काहीशी संभ्रमावस्था आहे. कारण नगराध्यक्ष हा लोकनियुक्त म्हणजे शहरातून निवडून द्यायचा झाल्यास संबंधित पदाचा उमेदवार ‘इलेक्शन मेरीट’ असणारा पाहिजे, अशी राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा आहे.