शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

क्रॉस व्होटिंगवर विरोधकांची भिस्त

By admin | Updated: July 9, 2015 00:41 IST

बाजार समितीचे राजकारण : टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कसली कंबर

राजाराम लोंढे -कोल्हापूर -बाजार समितीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग होण्याची भीती सत्ताधारी मंडळींना आहे; तर क्रॉस व्होटिंग होऊन आपणाला संधी मिळू शकते, यावर विरोधी आघाडीची भिस्त आहे. ‘गोकुळ’ व जिल्हा बॅँक निवडणुकीतील अनुभव सत्तारूढ गटाच्या पाठीशी असल्याने क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. समितीसाठी राष्ट्रवादी-जनसुराज्यची ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास,’ कॉँग्रेसप्रणीत ‘राजर्षी शाहू’ व शिवसेना-भाजपची ‘शिवशाहू शेतकरी परिवर्तन’ आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. संचालक मंडळात सर्वांत जास्त ११ जागा या विकास संस्थांच्या, तर ग्रामपंचायतीचे चार प्रतिनिधी आहेत. कार्यक्षेत्रातील साडेसहा तालुक्यांतील विकास संस्था व ग्रामपंचायतींमधील वर्चस्व पाहिले तर निकाल काय लागू शकतो, हे माहीत आहे. विकास संस्था गटात राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी व कागल तालुक्यांत राष्ट्रवादी कॉँग्रेस व जनसुराज्य या पक्षांचे वर्चस्व आहे. करवीरमध्ये कॉँग्रेसचे प्राबल्य आहे. तीच परिस्थिती ग्रामपंचायत गटांत आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत करवीर वगळता उर्वरित ठिकाणी राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्षांनी एकतर्फी बाजी मारली. त्यामुळे कागदावरील आकडेवारी पाहता समिती निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीचे पारडे जड दिसते; पण ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा अनुभव सत्ताधारी मंडळींच्या पाठीशी आहे. ‘गोकुळ’ निवडणुकीत सत्ताधारी गटाकडे ३२०० पैकी २४०० ठराव होते. प्रत्यक्षात चित्र वेगळेच पाहावयास मिळाले. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीतही दोन्ही कॉँग्रेस एकत्र असताना नवख्या शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी घेतलेले मतदान सत्ताधाऱ्यांची चिंता वाढविणारे होते. ठरावाच्या राजकारणात एवढे क्रॉस व्होटिंग होत असेल, तर बाजार समितीसाठी सर्व संचालकांचे मतदान आहे. त्यात पै-पाहुणा, तालुक्यातील उमेदवार असे राजकारण होत असल्याने मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग होणार हे निश्चित आहे. संस्थात्मक पातळीवरील ताकद पाहता ही निवडणूक राष्ट्रवादी आघाडी एकतर्फी जिंकू शकते; पण क्रॉस व्होटिंग झाले, तर आघाडीसमोरील अडचणी वाढू शकतात. मागील दहा वर्षांतील कारभाराबाबत राष्ट्रवादी आघाडीची प्रतिमा मलिन झाल्याने त्याचा फायदा होईल, असा कॉँग्रेस व शिवसेना-भाजप आघाडीचा दावा आहे. झालेल्या मतदानापैकी ३० टक्के मतदान क्रॉस झाले, तर राष्ट्रवादी आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. जास्तीत जास्त मतदान हे क्रॉस व्हावे, यासाठी दोन्ही विरोधी आघाड्यांचा प्रयत्न आहे; तर क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अडते-व्यापारी गटात धक्कादायक निकाल ?विकास संस्था व ग्रामपंचायत गटात काय होईल, याचे आडाखे बांधले जाऊ शकतात; पण अडते-व्यापारी व हमाल-तोलाईदार गटांत अशी अटकळ बांधता येत नाही. अडते-व्यापारी गटात दिग्गज रिंगणात असून विविध विभाग व त्या अंतर्गत राजकारणावर येथील जय-पराजय अवलंबून आहे. हमाल-तोलाईदार गटात बरीच वर्षे तोलाईदारांनीच प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी हमालांच्या प्रतिनिधींनी आव्हान उभे केल्याने येथेही धक्कादायक निकाल लागू शकतो.