शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

‘कुमुदा शुगर्स’च्या संचालकांची मालमत्ता जप्त करा

By admin | Updated: January 16, 2016 00:48 IST

शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची मागणी : निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

कोल्हापूर : ‘कुमुदा शुगर अ‍ॅँड अ‍ॅग्रो प्रॉडक्टस लि., बेळगाव’ या कंपनीने गतवर्षी रयत सहकारी साखर कारखान्यामधून उसाचे गाळप केले आहे. परंतु यापैकी ‘एफआरपी’नुसार प्रतिटन १२५० रुपयेच रक्कम ऊस उत्पादकांना दिली असून, उर्वरित रकमेसाठी संचालकांची कोल्हापूर, सांगली व सातारा येथील स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी शुक्रवारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. साखर आयुक्तांनी २२ एप्रिल २०१५ ला महसूल वसुली प्रमाणपत्र जारी केले होते. ऊस उत्पादकांना देय असणारी रक्कम पूर्णपणे फेड होण्यासाठी प्रसंगी कुमुदा शुगर्स च्या स्थावर व जंगम मालमत्तेची विहित पद्धतीद्वारे विक्री करून तसेच आवश्यकतेनुसार कुमुदा शुगर यांनी रयत सहकारी साखर कारखाना येथे उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीतून वसुल करण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम वसुलीतून ऊस पुरवठादार शेतकरी यांचे ऊस नियंत्रण आदेशातील तरतुदीनुसार म्हणजे ‘एफआरपी’ रक्कम खात्री करून संबंधितांना अदा करण्यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत केले होते. या आदेशानुसार कुमुदा शुगर्समार्फत रयत साखर कारखाना यांच्या कारखान्यावरील संपूर्ण साखर मोलॅसिस बगॅस इत्यादी उत्पादनाची जप्ती व विक्री करण्याची कार्यवाही करून २८ सप्टेंबर २०१५ अखेर १५ कोटी ४१ लाख १५ हजार २५४ रुपये ऊस उत्पादकांना देण्यात आली आहे. ही रक्कम देऊनही साखर आयुक्तांच्या आदेशानुसार २५ कोटी ३६ लाख ७९ हजार ३२९ पैकी माल जप्ती व विक्री रक्कम वजा जाता ९ कोटी ९५ लाख ६४ हजार ७५ रुपये व त्यावरील व्याजासह अद्याप वसुली होणे बाकी आहे. वरील रकमेच्या वसुलीस कुमुदा शुगर्स व रयत कारखान्याच्या करारातील अटींचा विचार करता कुमुदा शुगर्सच्या संचालक मंडळाच्या वैयक्तिक स्थावर व जंगम मालमत्ता विक्री करून हे पैसे द्यावेत, असे या निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात विजय पाटील, अंकुश निकम, भानुदास देसाई, रमेश हंजे, राजेंद्र पाटील, आदींचा समावेश होता.