शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

साखरेचे दर घसरू लागल्याने ऊसदराची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:07 IST

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याआधीच साखरेच्या दरात घसरण सुरू झाल्याने जाहीर केलेली उचल कशी द्यायची? मूळ एफआरपी देतानाही दमछाक होणार आहे. यासाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारच्या पातळीवर आवाज उठवावा, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.गळीत हंगाम सुरू होऊन आठ-दहा ...

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याआधीच साखरेच्या दरात घसरण सुरू झाल्याने जाहीर केलेली उचल कशी द्यायची? मूळ एफआरपी देतानाही दमछाक होणार आहे. यासाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारच्या पातळीवर आवाज उठवावा, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.गळीत हंगाम सुरू होऊन आठ-दहा दिवस झाले नाहीत तोपर्यंत प्रतिक्विंटल ३४५० रुपयांपर्यंत साखरेचे दर खाली आले आहेत. हंगाम संपल्यानंतर काय होईल, ही बाब कारखान्यांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. साखरेचे दर वाढू लागले की केंद्रीय वाणिज्य मंत्री रामविलास पासवान ट्विट करायचे, ‘कारखाने व व्यापाºयांना स्टॉक मर्यादा घातली.’ पण आता ते गप्प का? असा सवाल करीत गेल्या वर्षीपेक्षा प्रतिटन ३०० रुपये ‘एफआरपी’मध्ये वाढ झाल्याने सरासरी तीन हजार रुपये एफआरपी झाली आहे.उसाच्या पहिल्या उचलीबाबत निर्णय घेताना ३५०० रुपये साखरेचा दर गृहीत धरला होता. साखरेचे दर ३४०० रुपयांच्या खाली येऊ नयेत, यासाठी शेतकरी संघटनांचे नेते खासदार राजू शेट्टी, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत व रघुनाथदादा पाटील यांनी प्रयत्न केले पाहिजेत.सध्या राज्य बॅँकेने साखरेचे ३५०० रुपये मूल्यांकन केले असून त्यातील प्रक्रिया खर्च प्रतिटन २५० रुपये, अल्पमुदत कर्ज, नजरगहाण कर्ज, सहवीज / एम. टी. / मशिनरी आधुनिकीकरण कर्ज, पॅकेज पुनर्बांधणी कर्जहप्ता, थकीत व्याज यांसाठी प्रतिटन ५०० रुपये राखून ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे केवळ उसासाठी २२७५ रुपये उपलब्ध होणार आहेत. पुढील पंधरवड्याच्या साखरेवर मागील पंधरवड्यातील उसाचे पैसे भागवायचे म्हटले तरी अडचण येणार आहे.साखर मूल्यांकन व शॉर्ट मार्जिनसाखर मूल्यांकन बॅँकांकडून उसाची पहिली कमी पडणारीमिळणारी रक्कम उचल रक्कम३५०० रुपये २२२५ रुपये ३००० रु. ७७५ रुपये३४५० रुपये २१८२ रुपये ३००० ८१८ रुपये३४०० रुपये २१४० रुपये ३००० ८६० रुपये३३०० रुपये २०५५ रुपये ३००० ९४५ रुपयेयासाठीच तीन टप्प्यांत दर हवापक्क्या मालाचा दर निश्चित नसताना, तो वर्षभर गोदामामध्ये पडून राहत असताना कच्च्या मालाचा दर ठरविणारा साखर उद्योग हा एकमेव आहे. त्यामुळे कारखाने अडचणीत येणार आहेत. यासाठी उसाचा दर तीन टप्प्यांत देणे गरजेचे असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.शेट्टींवर विश्वास !देशातील शेतकरी संघटनांचा दोन दिवसांत दिल्लीत मोर्चा आहे. तिथे राजू शेट्टी साखरेच्या घसरलेल्या दराचा मुद्दा मांडतील, याचा मला विश्वास असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती