शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चौंडेश्वरी बॅँकेच्या विशेष सभेबाबत संभ्रमावस्था

By admin | Updated: June 7, 2016 07:34 IST

जनता बँकेचे अधिकारी फिरकलेच नाहीत : विलीनीकरणाचा पुनर्विचार करण्यासाठी सभासदांची शुक्रवारी सभा

इचलकरंजी : येथील चौंडेश्वरी सहकारी बॅँक विलीन करून घेण्यासाठी पुणेस्थित जनता सहकारी बॅँकेचे अधिकारी आलेच नाहीत; तर बॅँक विलीनीकरणाचा पुनर्विचार करण्यासाठी चौंडेश्वरी बॅँकेच्या सभासदांची १० जूनला विशेष सभा आयोजित केली आहे. अशा परस्परविरोधी प्रकारामुळे बॅँकेच्या सभासदांत मात्र संभ्रमावस्था आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा असे तीन जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या चौंडेश्वरी बॅँकेचे १५,९५२ सभासद आहेत. बॅँकेच्या प्रधान कार्यालयासह इचलकरंजीत तीन, कोल्हापूर, गांधीनगर, जयसिंगपूर, गडहिंग्लज, सांगली व कऱ्हाड अशा नऊ शाखा आहेत. बॅँकेस रिझर्व्ह बॅँकेने २० आॅगस्ट २०१४ पासून आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. चौंडेश्वरीकडे १९ कोटी रुपयांच्या ठेवी, ४.१६ कोटी रुपये कर्ज वितरण, तर १६.७२ कोटी रुपये तोटा आहे. बॅँक विलीनाची प्रक्रिया सुमारे दोन वर्षे सुरू आहे. त्यानंतर गतवर्षी जून महिन्यामध्ये पुणे येथील जनता सहकारी बॅँकेमध्ये चौंडेश्वरी बॅँक विलीन करण्याचा प्रस्ताव जनता बॅँकेच्या विशेष सभेमध्ये मंजूर झाला. त्याच्या अनुषंगाने आॅगस्ट महिन्यामध्ये चौंडेश्वरी बॅँकेच्या सभासदांची विशेष सभा झाली. या सभेमध्ये ‘चौंडेश्वरी’ जनता सहकारी बॅँकेमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव संमत झाला. दरम्यान, जानेवारी २०१६ मध्ये चौंडेश्वरी बॅँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवडणूक झाली.निवडणुकीला पाच महिने उलटले असतानाच इकडे जनता सहकारी बॅँकेने सहकार आयुक्तांकडून चौंडेश्वरी बॅँकेचे जनता बॅँकेत विलीनीकरणाचे आदेश घेतले. हा आदेश ४ जुलै २०१६ पासून लागू होणार असला तरी जनता बॅँकेने आपले सात अधिकारी चौंडेश्वरी बॅँकेच्या सात शाखांवर ६ जूनपासून पाठवून देत असल्याचे चौंडेश्वरी बँकेला कळविले. तरी त्यांना संपूर्ण सहकार्य करावे, असेही एका पत्रान्वये सांगितले. त्याप्रमाणे सोमवारी जनता बॅँकेचे अधिकारी येण्याची प्रतीक्षा संचालक विठ्ठलराव डाके व त्यांचे सहकारी करीत होते. मात्र, सायंकाळपर्यंत जनता बॅँकेचे अधिकारी आलेच नाहीत. (प्रतिनिधी)‘चौंडेश्वरी’वर ‘बुलढाणा’चे वर्चस्वजानेवारी २०१६ मध्ये चौंडेश्वरी बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. ही बॅँक पुनरुज्जीवित करण्याच्या अपेक्षेने बुलढाणा अर्बन को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या संचालकांनी ‘चौंडेश्वरी’च्या निवडणुकीमध्ये थेट सहभाग नोंदविला. चौंडेश्वरी बँकेची निवडणूक बिनविरोध करून बॅँकेच्या १५ संचालकांपैकी ११ संचालक ‘बुलढाणा’शी निगडित असलेले, तर चार संचालक इचलकरंजीचे झाले. त्यानंतर बॅँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत चौंडेश्वरी बॅँकेच्या अध्यक्षपदी राधेश्याम चांडक (जे बुलढाणा को-आॅप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष आहेत.) व उपाध्यक्षपदी श्यामसुंदर मर्दा यांची निवड करण्यात आली. अशा तऱ्हेने ‘चौंडेश्वरी’वर ‘बुलढाणा’चे वर्चस्व प्रस्थापित झाले.