शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

संगणकचालकामुळे नोटाबंदीतही रांगा टळल्या

By admin | Updated: December 28, 2016 00:02 IST

नरतवडे येथे उपक्रम : बँक आॅफ बडोदाच्या सरवडे शाखेच्या माध्यमातून गावातील लोकांना घरपोच सेवा

संजय पारकर-- राधानगरी --नोटाबंदीच्या काळात बँकेत शिल्लक असलेले स्वत:चे पैसे काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या. त्यामुळे होणाऱ्या त्रासाची वर्णने दररोज निदर्शनास येत होती. मात्र, याच काळात नरतवडे (ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायतीचा संगणक परिचालक प्रीतम अशोक पाटील याने बँक आॅफ बडोदाच्या सरवडे शाखेच्या माध्यमातून गावातील लोकांना घरपोच पैसे वाटप केले. घरबसल्या लोकांना विना त्रास सुविधा मिळाली. प्रीतम पाटील हा २०११ पासून या ग्रामपंचायतीकडे संगणक परिचालक म्हणून काम करतो. हे गाव बँक आॅफ बडोदाच्या सरवडे शाखेला जोडले आहे. या बँकेने त्याची आपला सेवा प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली आहे. त्याने गावातील पाचशे लोकांची बचत खाती सुरू केली आहेत. बँकेतून कर्ज वाटपही होते. यापूर्वी लोक बँकेत जाऊन व्यवहार करत. मात्र, नोटाबंदीनंतर यात अडचणी निर्माण झाल्यावर बँकेने त्याला गावातच व्यवहार करण्यासाठी बॉश मशीन दिले. या मशीनच्या साहाय्याने आधारकार्ड, एटीएम कार्ड किंवा बोटांच्या ठशांद्वारे रोख रक्कम काढणे, भरणे असे व्यवहार करण्यात येत आहेत. दररोज सकाळी बँकेत जाऊन तो काही रक्कम घेऊन येतो व लोकांना हजार-दोन हजार रुपये याप्रमाणे वाटप करतो. काही कर्जदार कर्जाचा हप्ताही भरतात. तेव्हा जास्त रक्कम जमा होते तेव्हा लोकांना जादा पैसे मिळू शकतात. लोकांना आपल्या सवडीनुसार कोणत्याही वेळी तो सेवा देतो. त्यामुळे आपल्या कामाचा खोळंबा न करता पैसे मिळत असल्याने लोकही खूश आहेत. २६ नोव्हेंबरपासून गेल्या आठवड्यापर्यंत त्याने पाच लाखांपर्यंत रक्कम लोकांना वाटली आहे. या कामासाठी त्याला बँकेकडून महिना अडीच हजार रुपये व प्रत्येक व्यवहारामागे ऐंशी पैसे असे मानधन मिळते.गटविकास अधिकारी एच. डी. नाईक यांनी नरतवडे येथे भेट देऊन माहिती घेतली व त्याचे कौतुक केले. यासाठी बँकेचे शाखाधिकारी समीर जठार, सरपंच सुरेखा कुंभार, उपसरपंच संजय पाटील, ग्रामसेवक ए. एस. ठोंबरे व ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य मिळाल्याचे प्रीतम पाटील याने सांगितले.