शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

शिवाजी पेठेत ‘राष्ट्रवादी’च्या तडजोडी; कोराणे, राऊत, सावंत यांचे प्रभाग निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:25 IST

शिवाजी पेठेतील प्रभाग क्रमांक ५५ पद‌्माराजे उद्यान हा राजकीय तसेच सोयीच्या तडजोडी घडवून आणण्यास कारणीभूत ठरला. पद‌्माराजे उद्यान प्रभागावर ...

शिवाजी पेठेतील प्रभाग क्रमांक ५५ पद‌्माराजे उद्यान हा राजकीय तसेच सोयीच्या तडजोडी घडवून आणण्यास कारणीभूत ठरला. पद‌्माराजे उद्यान प्रभागावर नागरिकांचा ‘मागासवर्ग - महिला’ असे आरक्षण पडले आहे. या प्रभागातून माजी नगरसेवक अजित राऊत यांनी त्यांच्या पत्नी माजी महापौर सुनीता राऊत यांना निवडणुकीस उभे करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी उत्तम कोराणे यांनीही त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका अर्चना कोराणे यांना उभे करण्याचा निर्णय घेतला. वेताळ तालीम परिसरात प्रत्येक निवडणुकीत एकच उमेदवार उभा करून त्यास निवडून आणण्याचा प्रयत्न यापूर्वी कै. रामभाऊ चव्हाण व कै. बबनराव कोराणे करत होते.

परंतु यावेळी चव्हाण व कोराणे यांच्या निधनानंतर राजकारण बदलले. कोणी लढावे आणि कोणी थांबावे याचा गुंता निर्माण झाला. कोराणे यांना पुढील निवडणुकीत संधी देण्याचा शब्द ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दिला होता. त्यामुळे कोराणे यांनी आक्रमक भूमिका घेत मुश्रीफ यांच्याकडे दाद मागितली. गेले दोन-तीन दिवस शिवाजी पेठेत याच घडामोडी घडत होत्या. त्यातून तीन प्रभागांत तडजोडी झाल्या.

संभाजीनगर बस स्थानक प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग - महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे तेथे महेश सावंत यांना उभे राहण्यात अडचणी आहेत. त्यामुळे उत्तम कोराणे यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांना राजलक्ष्मीनगर प्रभागातून उभे राहण्याचा सल्ला दिला. सावंत त्यास राजी झाले. सुनीता राऊत यांना संभाजीनगर बस स्थानक येथे उभे करून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घ्यायची आणि त्याच्या बदल्यात राऊत यांनी पद्माराजे उद्यान प्रभागावरील हक्क सोडायचा, अशी चर्चा झाली. तिघेही त्यास तयार झाले. त्यानंतर सोमवारी मंत्री मुश्रीफ यांच्यासमवेत बैठक झाली. बैठकीत तडजोडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी आर. के. पोवार, राजू लाटकर उपस्थित होते.

चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष

माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीस या प्रभागातून उभे करण्याची घोषणा केली आहे. कोराणे व चव्हाण नातलग आहेत. अर्चना कोराणे यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे चव्हाण कुटुंबीय काय करणार हा एक मुद्दा उत्सुकतेचा ठरला आहे.