शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांत पूर्णत्वास

By admin | Updated: August 10, 2015 01:20 IST

सुरेश प्रभू : कुडाळ स्थानक अद्ययावत करण्यास प्रारंभ

कुडाळ : कोकण रेल्वेच्या प्रवाशांना अद्ययावत सोयीसुविधा निर्माण होण्याकरिता येथील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याच धर्तीवर कुडाळ रेल्वेस्थानकही येत्या तीन ते चार महिन्यात अद्ययावत होणार आहे. या रेल्वेस्थानकाच्या बाजूलाच सुसज्ज असे गार्डनही तयार करण्यात येणार, असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कुडाळ येथे बोलताना दिली. कोकण रेल्वे प्रकल्प आणि जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कुडाळ रेल्वेस्थानक अद्ययावतदृष्ट्या विकसीत करावे या कुडाळ तालुका भाजपाच्या मागणीला मूर्त स्वरूप आले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तत्काळ मान्यता दिली. रेल्वे प्रशासनाने आराखडा तयार करून कामासही सुरूवात केली. त्याचा प्रारंभ शनिवारी सायंकाळी सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुडाळ रेल्वेस्थानकातील कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते, बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमांना प्रभू यांनी पुष्पांजली अर्पण केली. त्यांचे स्वागत सीबीएससीच्या लहान मुलांनी, कुडाळ तालुका भाजपाने तसेच कुडाळवासीयांनी उत्स्फूर्तपणे केले. कोकणचे ‘कोकणपण’ येथील कोणत्याही प्रकारचा विकास करताना कोकणपण टिकणे गरजेचे आहे. नुसत्या हे करणार, ते करणार अशा घोषणा न करता विकास करून दाखवावा व आम्ही घोषणा केल्यावर तो विकास करीत आहोत. विकास करताना कोकणपणही टिकवित आहोत, असा टोला प्रभू यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना लगावला. कोकण रेल्वेचे प्रस्तावित हॉस्पिटल वेंगुर्ले येथील सेंट लुक्समध्ये व्हावे व त्यासाठी सेंट लुक्सच्या समितीने त्यास अनुमती द्यावी, असे आवाहन यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, भानूप्रसाद तायल यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)सुरेश प्रभू सांगतात ते करणारच : दीपक केसरकरयावेळी पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, सुरेश प्रभू यांच्या नावातच प्रभू असून ते सांगतात ते करतातच. सावंतवाडी टर्मिनसच्या वेळी एक महिन्यापूर्वी त्यांनी कुडाळ रेल्वेस्थानकाच्या नुतनीकरणाबाबत सांगितले होते. त्याची आता सुरुवात झाली आहे. तसेच आजही त्यांनी पेडणे-कारवार ही नवीन रेल्वे सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. भूमिपुत्र असल्याने कोकण रेल्वेचा विकास निश्चित : तायलकोकण रेल्वेचे संचालक भानू तायल म्हणाले की, देशाच्या विकासात रेल्वेचा सर्वात मोठा वाटा आहे. येथील भूमिपुत्र असलेले प्रभू हे देशाचे केंद्रीय रेल्वेमंत्री असल्याने कोकण रेल्वेचा विकास निश्चितच आहे.