शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित प्रकल्प त्वरित पूर्ण करा

By admin | Updated: April 15, 2015 00:45 IST

चंद्रकांतदादांचे निर्देश : विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विमानतळ, विभागीय क्रीडा संकुल, तसेच शिरोली-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण हे प्रलंबित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित विमानतळ, विभागीय क्रीडा संकुल, तसेच शिरोली-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करू, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर विमानतळ विस्तार व विविध सुविधांसाठी भूसंपादन प्रस्तावात समाविष्ट असणाऱ्या सरकारी जमिनीचे हस्तांतरण यासंदर्भात त्यांनी आढावा घेतला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राजाराम माने, करवीरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत पाटील, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, विमान पत्तन प्राधिकरणच्या एअरपोर्ट इन्चार्ज रूपाली अभ्यंकर, एम.आय.डी.सी.चे उपअभियंता संजय जोशी उपस्थित होते. विमानसेवा चार वर्षांपासून बंद आहे. विमानतळ भूसंपादनाचा प्रस्ताव कोणी बनवायचा, हा प्रश्न अनुत्तरित असून, याबाबत समन्वय साधण्यासाठी एक अधिकारी नेमावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे शिरोली-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. रस्ता चौपदरीकरण कामाच्या आढावा बैठकीवेळी इचलकरंजीच्या उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. उपळे, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, तहसीलदार वर्षा शिंगण-पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कामांचे ठेकेदार उपस्थित होते. विभागीय क्रीडा संकुलामध्ये स्पर्धा, शिबिरे आयोजित करावीत विभागीय क्रीडा संकुलामध्ये पूर्ण झालेल्या कामांच्या ठिकाणी स्पर्धा, शिबिरे आयोजित करावीत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. उपळे, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक यांच्यासह अन्य अधिकारी व ठेकेदार, वास्तुविशारद उपस्थित होते.