शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

‘हॉटेल सयाजी’चे उद्या कमर्शियल लाँचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2015 00:37 IST

ऋतुराज पाटील : कोल्हापूरची नेमकी गरज ओळखून हॉटेलची उभारणी

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासासाठी वर्ल्ड क्लास हॉस्पिटॅलिटीची गरज होती. ही गरज ‘हॉटेल सयाजी’ने पूर्ण केली आहे. अत्याधुनिक सुविधांसह परिपूर्ण असलेले ‘हॉटेल सयाजी’ उद्या, गुरुवारपासून सर्वांसाठी खुले होईल. यादिवशी पंचतारांकित सुविधा असलेल्या ‘सयाजी’चे कमर्शियल लाँचिंग करून ते ग्राहकांच्या सेवेत रुजू केले जाणार आहे, अशी माहिती डी. वाय. पी. हॉस्पिटॅलिटीचे संचालक ऋतुराज पाटील व सयाजी ग्रुपच्या संचालिका सुचित्रा धनानी यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.संचालक ऋतुराज पाटील म्हणाले, शिक्षण, क्रीडा, आदी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या डी. वाय. पाटील ग्रुपने कोल्हापूरची नेमकी गरज ओळखून डी. वाय. पी. हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ‘हॉटेल सयाजी’ची उभारणी केली. आदरातिथ्याबद्दल जागरूक असणाऱ्या सयाजी ग्रुपची हॉटेल्स बडोदा, इंदोर, पुणे व भोपाळ येथे सुरू आहेत. ‘बारबेक्यू नेशन’च्या ४५ उपशाखा कार्यरत आहेत. पर्यटक, भाविक आणि व्यवसायानिमित्त कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी ‘सयाजी’च्या माध्यमातून चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात आलेल्या ‘सयाजी’ला कोल्हापूरकरांनी भरभरून पाठबळ द्यावे.संचालिका सुचित्रा धनानी म्हणाल्या, बडोदा, इंदौर, पुणे आणि कोल्हापूरचे एक वेगळे नाते आहे. त्यामुळेच आम्ही पुण्यानंतर कोल्हापुरात ‘सयाजी’ची सुरुवात केली. अतिथी, कर्मचारी, पुरवठादार, गुंतवणूकदार यांना खूश करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आमचा कोणताही कर्मचारी टिप्स स्वीकारणार नाही. स्थानिक आढावा घेऊन त्या पद्धतीने आम्ही जेवणाच्या रुचीत बदल करतो. मॅरेज पॅकेजची सुविधा ‘सयाजी’कडे उपलब्ध आहे. ती कोल्हापुरात सुरू केली आहे. आम्हाला कोल्हापूरकरांची साथ हवी आहे.जनरल मॅनेजर अभिजित रेगे म्हणाले, कोल्हापुरात गेल्या महिन्याभरात ‘सयाजी’ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूरकरांसाठी आम्ही वेगवेगळ्या संकल्पना राबविणार आहोत. पत्रकार परिषदेस ‘सयाजी’चे कॉर्पोरेट संचालक अमित सिन्हा, अभिजित पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सन्मानार्थ ‘सयाजी’ नाव...बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांना दूरदृष्टी होती. त्याद्वारे त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, आदी क्षेत्रांत कार्य केले. आमच्या हॉटेलची सुरुवात बडोद्यामधून झाली. महाराजांच्या सन्मानार्थ आम्ही आमच्या हॉटेल ग्रुपचे नाव ‘सयाजी’ ठेवले असल्याचे संचालिका सुचित्रा धनानी यांनी यावेळी सांगितले.‘सयाजी’ची वैशिष्ट्येसर्व सुविधांनी युक्त १२० रूम्सदक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत जास्त बँक्वेटिंगची क्षमता६० हजार स्क्वेअर फुटांचे ‘साज’ हे लॉन उपलब्धकॉर्पोरेट कंपन्यांच्या बैठकीसाठी बिझनेस सेंटरची सुविधा६०० लोकांची आसन व्यवस्था असलेला ‘मेघ मल्हार’ हा बँक्वेट हॉल२४ तास सुरू असणारे ‘मून ट्री’ हे कॉफी शॉप