शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य-सुधारित : कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सुरज पवार यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:17 IST

कोल्हापूर : येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सुरज पवार यांचा ‘हिलिंग हॅन्ड्‌स इन कॅन्सर’ या पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन ...

कोल्हापूर : येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सुरज पवार यांचा ‘हिलिंग हॅन्ड्‌स इन कॅन्सर’ या पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नागपूरमध्ये २ जानेवारीला ‘इन्स्पायर ॲवॉर्डस्‌ शो’ नावाने हा कार्यक्रम झाला. डाॅ. पवार यांच्या वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कॅन्सरवरील उपचारांमध्ये डॉ. पवार यांच्या कार्याची नोंद देश आणि जागतिक पातळीवर घेतली गेली आहे.

डॉ. पवार हे अवनी, सांजवात, एकटी यासारख्या सामाजिक प्रकल्पांशी जोडलेले असून, त्यातून गोरगरीब, गरजू रुग्णांची सेवा ते करतात. त्यांच्या या कार्यकतृत्वाची नोंद घेऊनच मंत्री गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पवार यांनी अन्ननलिकेच्या कॅन्सरची अवघड शस्त्रक्रिया सोपी करून जगात भारताचा नावलौकीक वाढवला. अमेरिकेनेही या वैद्यकीय संशोधनाची दखल घेत ‘द पवार टेक्निक’ या नावाने पाठपुस्तकात समावेश केला आहे. कॅन्सर सर्जन झाल्यानंतर परदेशात राहण्याऐवजी डॉ. पवार भारतात परतले. कोल्हापुरात संपूर्ण कॅन्सरचे उपचार एकाच छताखाली आणले. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक या भागातील रुग्णांचे पुण्या-मुंबईचे हेलपाटे वाचले. आजपर्यंत डाॅ. पवार यांनी रुग्णालयामध्ये १० हजार शस्त्रक्रिया करतानाच ५० हजार रुग्णांना केमोथेरपी तंत्राद्वारे बरे केले आहे. यातील ८० टक्के उपचार हे जनआरोग्य योजनेखाली मोफत केले आहेत.

फोटो: ०९०१२०२१-कोल-डॉ. सुरज पवार न्यूज

कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सुरज पवार यांचा ‘हिलिंग हॅन्ड्‌स इन कॅन्सर’ या पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूरमध्ये गौरव करण्यात आला.