शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

महाविदयालये ऑफलाईन नाही तर ऑनलाईनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST

कोल्हापूर : महाविद्यालयांचे सत्र १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे; पण अजूनही कोरोना आजाराच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. ...

कोल्हापूर : महाविद्यालयांचे सत्र १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे; पण अजूनही कोरोना आजाराच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे ऑफलाईनऐवजी ऑनलाईन महाविद्यालये सुरू होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

शिवसंपर्क अभियानाच्या उद्‌घाटन कार्यक्रमास आल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात बोलत होते. ते म्हणाले, उच्चशिक्षण मंत्री पदावरून अनेक चांगले निर्णय घेतले आहेत; पण कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या आहेत. बारावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे सीईटीच्या परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत; पण परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक जाहीर केली आहे. विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक पदासाठी निवड प्रक्रिया तज्ज्ञातर्फे केली जात आहे. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणणे चुकीचे आहे. कोकणातील नाणार प्रकल्पासाठी विरोधी पक्षनेत्यांनी सत्तेत असताना प्रयत्न केले असते तर बरे झाले असते. आता आमच्यासाठी हा विषय संपला आहे.

चौकट

पक्षाचा कार्यक्रम तिथे कसा ?

शासकीय विश्रामगृहात मंत्री, आमदार, खासदारांच्या पत्रकार परिषदा, शासकीय कार्यक्रम होतात. पण परिसरात भगवे ध्वज लावून शिवसेनेने शिवसंपर्क अभियानाच्या उद्‌घाटनचा कार्यक्रम चक्क विश्रामगृहात घेतला, या कार्यक्रमाची परवानगी घेतली होती का, असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाले.