शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बंदिस्त गटारीबाबत आरोग्याधिकारी धारेवर

By admin | Updated: December 12, 2014 00:36 IST

टोलविरोधी कृती समिती : ‘आयआरबी’च्या गटर्स सफाईबाबत विचारला जाब; मंगळवारी संयुक्त पाहणी दौरा

कोल्हापूर : शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून ‘बीओटी’ तत्त्वावर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या बाजूला दुतर्फा बांधण्यात आलेल्या गटारींची साफसफाई कितीवेळा केली? अशी विचारणा आज, गुरुवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने केली. याप्रश्नी महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांना धारेवर धरत ‘आयआरबी’ विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. यावर शहरात बांधलेल्या गटारींची पाहणी करण्यासाठी समिती व प्रशासन यांचा मंगळवारी (दि. १६) संयुक्त पाहणी दौरा करू, असे आश्वासन डॉ. दिलीप पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व ‘आयआरबी’ने ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर शहरात ४९.४९ किलोमीटरचे रस्ते तयार केले. या रस्त्यांच्या कडेला दुतर्फा बांधलेल्या बंदिस्त गटारींची रोज साफसफाई करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. या गटारींतून प्रवाहित होणाऱ्या सांडपाण्याची निर्गत व्यवस्थित होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गत तीन वर्षांत या गटारींची कितीवेळा स्वच्छता केली? अशी विचारणा बाबा इंदुलकर यांनी केली. तसेच, कितीवेळा त्यावरील झाकणे उघडून गटारींची साफसफाई केली? यांत्रिक व्यवस्था उभी केली आहे का? ‘आयआरबी’ला महापालिकेने गटारींची ‘एनओसी’(ना हरकत प्रमाणपत्र) दिली आहे का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यानंतर दिलीप देसाई, दिलीप पवार यांनीही या प्रश्नांचा जाब विचारला. त्यावर डॉ. दिलीप पाटील यांनी, बांधलेली गटारे साफसफाईसाठी अडचणीची आहेत. तरीही साफसफाई करू, असे सांगितले. विजय पाटील यांनी, गटारी स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. शक्य तेवढे प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात बाबा पार्टे, संभाजी जगदाळे, अशोक पोवार, दीपा पाटील, अजित सासने, महेश सासने, लाला गायकवाड, सुरेश जरग, अशोक रामचंदानी, जयकुमार शिंदे, हंबीरराव मुळीक, वैशाली महाडिक, गीता राऊत, विवेक कोरडे, राजवर्धन यादव, सुनील मोहिते, वसंतराव मुळीक, गौरव लांडगे, सुजाता चव्हाण, सुशीला चव्हाण, किशोर घाटगे, सुनील पाटील, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, अर्जुन जाधव, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)मांडलेले मुद्दे असे...१) गटारींमुळे रोगराई पसरून मानवी जीवन धोक्यात येऊ शकते.२) १७ डिसेंबर २०११ पासून आजअखेर कितीवेळा ही गटारे स्वच्छ केली ?३) गटारींची रोज साफसफाई करण्याची महापालिकेची जबाबदारी सक्षम अधिकाऱ्याला खुर्चीवर बसवामहापालिकेने आरोग्य विभागाशी निगडित नेमलेल्या अधिकाऱ्यांकडे पदविका नाही. त्यामुळे या पदावर सक्षम अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसवावे, अशी मागणी दिलीप देसाई यांनी यावेळी केली.महापालिकेबरोबर ‘आयआरबी’ने कसा करार केला आहे, हे सर्वप्रथम पाहणे गरजेचे आहे. काय करार केला आहे, हे मी पाहिलेले नाही, ते पहिल्यांदा बघू. - डॉ. दिलीप पाटील, प्रभारी आरोग्य अधिकारी, महापालिका.