शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात आचारसंहितेचा धसका

By admin | Updated: January 12, 2017 01:25 IST

दुसऱ्या टप्प्यात मतदान : क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमातून पदाधिकारी पडले बाहेर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याचे समजताच जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमातून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. आचारसंहितेचा धसका घेऊन ते बाहेर पडल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा बुधवारी होणार याची कल्पना बहुतांशी पदाधिकारी, सदस्यांना होती. त्यामुळे फारसे पदाधिकारी जिल्हा परिषदेकडे फिरकलेच नाहीत. मात्र, संध्याकाळी क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी अध्यक्षा विमल पाटील, बांधकाम समितीच्या सभापती सीमा पाटील, पक्षप्रतोद शहाजी पाटील, सदस्य अर्जुन आबिटकर हे पोलिस मैदानावर पोहोचले. अतिशय जल्लोषी वातावरणामध्ये बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवातही झाली. एवढ्यात जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाकडे (पान ८ वर) ...अखेर शाहू पुरस्कार वितरण राहिलेचकाँग्रेस-स्वाभिमानीच्या जिल्हा परिषदेतील सत्तारूढांना तीन वर्षांचे जिल्हा परिषदांना देण्यात येणारे शाहू पुरस्कार न देण्याची नामुष्की मात्र ओढावून घ्यावी लागली. २०१४/२०१५/२०१६ या तीन वर्षांचे हे पुरस्कार १५ सदस्यांना जाहीर करण्यात आले. विमल पाटील यांच्यापासून ते अरुण इंगवले यांच्यापर्यंतच्या आघाडीच्या १५ सदस्यांना हे पुरस्कार देण्यात येणार होते. मात्र, वेळेत या कार्यक्रमाचे नियोजन करता न आल्याने कारकिर्दीत जाहीर झालेला पुरस्कार मात्र या विजेत्यांना स्वीकारता आला नाही.जिल्हा परिषदेची आचारसंहिता जाहीर झाली आणि अध्यक्षा विमल पाटील, बांधकाम समितीच्या सभापती सीमा पाटील, पक्षप्रतोद शहाजी पाटील आणि सदस्य अर्जुन आबिटकर यांनी बक्षीस वितरण न करता बाहेर पडणे पसंद केले.