शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेसाठी ७ जानेवारीपासून आचारसंहिता शक्य

By admin | Updated: December 27, 2016 01:05 IST

चंद्रकांतदादा पाटील : १५ ते २१ फेबु्रवारीमध्ये चार टप्प्यांत मतदान होणार; दहा महापालिकांमध्येही होणार निवडणुका

कोल्हापूर : राज्यातील २६ जिल्हा परिषदा व दहा महानगरपालिकांसाठी ७ जानेवारीपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता असून, १५ ते २१ फेबु्रवारीच्या दरम्यान चार टप्प्यांत मतदान होईल, अशी शक्यता राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी कोल्हापूर येथे व्यक्त केली. खुद्द महसूलमंत्र्यांनी ही शक्यता व्यक्त केल्याने जानेवारीच्या पहिल्या किंवा अगदीच दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होणार हे निश्चित मानले जात आहे. कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही शक्यता व्यक्त केली. पाटील म्हणाले, या तारखा जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम ते घोषित करतील. मात्र, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या सभागृहांच्या संपणाऱ्या मुदतींचा विचार करता ७ जानेवारीपासून आचारसंहिता लागू होईल, असे वाटते. त्यानंतर चार टप्प्यांत मतदान होईल. राज्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने जिल्हा परिषदांचे आणि महानगरपालिकांचे मतदान चार टप्प्यांत घेण्याचे नियोजन आहे. ज्या जिल्ह्यात महानगरपालिकेची निवडणूक आहे, तेथे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांचे मतदान एकाच दिवशी घेण्यात येईल. या सभागृहांच्या मुदती या मार्चमध्ये संपत असल्याने त्याआधी निवडणुका होऊन नवे सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी) तारखा जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग स्वायत्तबहुतांश सभागृहांच्या मुदती मार्चमध्ये संपत असल्याने त्याआधी नवे सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक