शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांविरोधात संघर्षाचा ‘नारळ’ फुटला

By admin | Updated: February 19, 2015 00:22 IST

आरोग्य शिबिराचे दोन वेळा उद्घाटन : महापौर येताच नगरसेवकांचा कार्यक्रमावर बहिष्कार टाकून काढता पाय

 कोल्हापूर : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत मोरे-मानेनगर येथे बुधवारी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन समारंभात महापौर राजीनाम्याचे पडसाद उमटले. उपमहापौर मोहन गोंजारे यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर तृप्ती माळवी येण्यापूर्वीच उद्घाटनाचे सोपस्कार पूर्ण केले. यानंतर महापौर शिबिराच्या ठिकाणी येताच नगरसेवकांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाक त काढता पाय घेतला. प्रशासनाने ठरल्याप्रमाणे पुन्हा महापौरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन उरकले. ही घटना येत्या काळात ‘महापौर विरुद्ध नगरसेवक’ यांच्यातील शीतयुद्धाची नांदी च असल्याचे बोलले जात आहे. महापौरपदाची मुदत संपल्यानंतरही नेत्यांचे आदेश डावलत महापौर तृप्ती माळवी यांनी पायउतार होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चिडलेल्या राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांविरुद्ध ‘एल्गार’ पुकारला आहे. आज आरोग्य शिबिराच्या उद्घाटनावरून महापौर व नगरसेवक यांच्यातील शीतयुद्धाचा प्रत्यक्ष ‘नारळ’ फुटला. येत्या काळात दोन्हीकडील दरी अधिक रुंदावत जोरदार संघर्ष होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.आरोग्य विभागाने राजशिष्टाचाराप्रमाणे महापौरांच्या हस्ते शिबिराच्या उद्घाटनासाठीच्या निमंत्रण पत्रिका छापल्या. पत्रिकेत रीतसर सर्व पदाधिकारी व स्थानिक नगरसेवकांचाही उल्लेख केला. सकाळी दहाच्या सुमारास उद्घाटनाची वेळ निश्चित करण्यात आली. मात्र, ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास अगोदर गटनेता शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, चंद्रकांत घाटगे, महेश गायकवाड, इंद्रजित बोंद्रे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लीला धुमाळ कार्यक्रमस्थळी आले. उपमहापौर मोहन गोंजारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. दरम्यान, महापौर तृप्ती माळवी कार्यक्रमस्थळी आल्या. महापौर येताच सर्व पदाधिकारी शिबिराच्या ठिकाणाहून महापौरांशी न बोलताच निघून गेले. यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत महापौरांनी फीत कापून शिबिराचे दुसऱ्यांदा उद्घाटन केले. घडल्या प्रकाराची जोरदार चर्चा घटनास्थळी व महापालिकेत सुरू आहे. (प्रतिनिधी)प्रशासनाच्या अडचणी वाढणार सत्ताधारी नगरसेवकांनी महासभेला अनुपस्थित राहून बहिष्कार टाकण्याची घोषणा नुकतीच केली आहे. आजचे उद्घाटन ही महापौर व नगरसेवक यांच्यातील शीतयुद्धाची सुरुवात आहे. आर्थिक नियोजनासाठीची महासभा २० मार्चपर्यंत घेणे गरजेचे आहे. महापौर-नगरसेवक यांच्यात वाद वाढत जाऊन ही सभाच न झाल्यास प्रशासनापुढील अडचणी वाढणार आहेत.नेते हतबलमहापौर तृप्ती माळवी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. महापालिकेच्या राजकीय व सामाजिक उपक्रमांतूनही त्या आता सक्रीय झाल्या आहेत. महापौरांच्या राजीनाम्याबाबत आवाहन करण्यापलीकडे नेत्यांच्या ‘हाता’त काहीच राहिलेले नाही. पडद्यामागे महासभेच्या कोरमची जोडणी सुरू आहे. अपक्ष नगरसेवक उघडपणे सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महापौरांविरोधात पुकारलेल्या अहंकाराचे युद्ध भविष्यात रस्त्यावर अवतरण्याची शक्यता आहे.महापालिकेत उत्सुकतामहापौर व नगरसेवक यांच्यातील शीतयुद्धाची सुरुवात नेमकी कधी व कशी होणार याबाबत महापालिका वर्तुळात उत्सुकता होती. ही कोंडी आजच्या उद्घाटनामुळे फुटली.