शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

नारळ फुटल्यापासून धरणाला गळती!

By admin | Updated: May 28, 2015 00:59 IST

लाखो लिटर पाणी वाया : कामाच्या दर्जाबाबत साशंकता; गळतीकडे प्रशासनाने दुर्लक्ष; दोन वर्षांपासून ठेकेदारही गायब

एकनाथ माळी - तारळे -तारळी धरणाला लोकार्पण सोहळ्यापासून गळतीचा शाप लागला आहे. सुमारे दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून अधिकाऱ्यांकडून आश्वासनांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. मात्र गळती काढण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस लोकांमध्ये संभ्रमावस्था व धरणाच्या टिकावूपणाबद्दल शंका उत्पन्न होत आहे. मुरूड, ता. पाटण येथे १९९८ साली ५.८५ टिएमसी इतका पाणीसाठा असणाऱ्या तारळी धरणाचा नारळ फुटला. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याचा दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळाही संपन्न झाला. त्यावेळीपासून आजअखेर धरणाला तळातून, भिंतीमधुन गळती लागली आहे. त्याकडे आजपर्यंत सर्वांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. ग्रामस्थांनी चौकशी केल्यास प्रत्येक अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी उत्तरे मिळतात. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, हा ग्रामस्थांसमोर प्रश्न आहे. दर्जा व इतर कारणांनी सुरूवातीपासूनच धरणाचे काम चर्चेत राहिले. परराज्यातील ठेकेदार असल्याने अनेकांनी धरणाच्या कामात हात धूवून घेतला. त्यामुळे धरणाची सध्याची स्थिती चिंताजनक आहे. अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी मागणी करूनही फक्त ठेकेदारांना सुचना दिल्याचे सुमारे वर्षभरापासून सांगण्यात येत आहे. पण आजअखेर गळती काढण्याच्या कामाला सुरूवात न झाल्याने अधिकारी कमजोर व ठेकेदार शिरजोर अशी वेळ आली आहे. पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शंभूराज देसाई यांची धरणावर मोठी सभा पार पडली असून आजही गळतीसारख्या गंभीर गोष्टीची दखल घेण्याची गरज कुणाला दिसून येत नाही. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकार्पण सोहळ्यानंतर ठेकेदारांना धरणाची गळती काढण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी त्यांचा ठराविक निधी शिल्लक ठेवल्याचे सांगण्यात आले. मग दोन वर्षांपासून ठेकेदार धरणाकडे फिरकत नसल्याने यामागचे गौडबंगाल लोकांसमोर येणार का ? अधिकारी सांगत असलेला ठेकेदारांचा शिल्लक निधी नक्की शिल्लक आहे का ? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पर्यटक व लोकांच्या मनात भिती जैसे थे राहिली आहे. सुमारे एक टीएमसी पाणी वायावेळोवेळी ग्रामस्थांनी याबाबत आवाज उठवला तरी अधिकारी व लोकप्रतिनिधी ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ करीत आहेत. कोण कोणाला पाठिशी घालून कोण कुणाचे पाप झाकतय हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. पर्यटकांच्या अंदाजानुसार अर्धा ते एक तास टी.एम.सी पाणी गळतीद्वोर नदीत वाहून जात आहे.सुचनांना ठेकेदाराकडून केराची टोपलीगळतीच्या प्रश्नावर जनतेमध्ये संशयाचे वातावरण आहे. तर अधिकारी व ठेकेदार यांच्यात कसलाच ताळमेळ दिसत नाही. दोन वर्षांपूर्वी ठेकेदारांना केलेल्या सुचनांना केराची टोपली दाखवली की काय, का अधािकऱ्यांचा वचक कमी झाला हे समजत नसल्याने दिवसेंदिवस धरणाच्या टिकाऊपणाबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित करण्यात येत आहे.