शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सहकार परिषद मैलाचा दगड ठरेल

By admin | Updated: January 18, 2016 00:32 IST

काकासाहेब कोयटे : राज्यातील १६ हजार पतसंस्थांचे नेतृत्व राज्य पतसंस्था फेडरेशनकडे

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन राज्यातील १६ हजार पतसंस्थांचे नेतृत्व करीत आहे. सहकार परिषदेमध्ये पतसंस्थांच्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. परिषदेतील अहवाल मुख्यमंत्री, सहकारमंत्री, सचिव यांना सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या कामात आजची सहकार परिषद मैलाचा दगड ठरणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.राज्यातील पतसंस्थांचे कामकाज १९९७च्या उपविधीआधारे सुरू आहे. मात्र, या सहकार परिषदेमध्ये पतसंस्थांमधील अडचणींविषयी चर्चा करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने एक लाखापर्यंतच्या ठेवीसाठी विमा संरक्षण दिले आहे. त्याप्रमाणे पतसंस्था ठेवींना विमा संरक्षण मिळावे, यासाठी फेडरेशनने परदेशी पतसंस्थांचा अभ्यास सुरू केला आहे. अहमदनगर जिल्हा पतसंस्थेतर्फे स्थैर्यनिधीसाठी लिक्वीडीटी बेस डिपॉझिट फंड विमा संरक्षणाचा शुभारंभ सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हिरवेबाजार येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे अहमदनगर पतसंस्था दीड लाखापर्यंतच्या ठेवीवर विमा संरक्षण देऊ शकते. पतसंस्थेच्या कामकाजात व्यावसायिकता, गतिमानता, आधुनिकता आणण्यासाठी फेडरेशन प्रयत्नशील आहे. व्यावसायिकतेमध्ये उत्पादने विक्रीबरोबर सर्वसामान्य ग्रामीण जनतेसाठी आॅनलाईन खरेदी तसेच सुवर्ण खरेदी योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कोयटे यांनी दिली. कामकाजात आधुनिकता व गतिमानता आणत असताना पेपरलेस, कॅशलेस बँकिंग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मोबाईल बँकिंग सुरू करुन पतसंस्था भक्कम करण्याचा प्रयत्न आहे.आजपर्यंत पतसंस्थेबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र, आता पतसंस्थांची चांगली वाटचाल सुरू आहे. पतसंस्थांच्या नाहक चौकशा लावल्या जातात, त्यासाठी पतसंस्था सामोरे जाण्यास तयार आहे. मात्र, थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल करण्यासाठीही सहकार खात्याने आवाहन करावे, अशी मागणीही या परिषदेच्या अनुषंगाने करण्यात येणार असल्याचे काकासाहेब कोयटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)रौप्य महोत्सव : निमंत्रितांची परिषदरत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी निमंत्रितांची सहकार परिषद आयोजित केली होती.