शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उपसाबंदी आली २२ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 00:30 IST

उपसाबंदी शिथिल : रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी उपाय

 गडहिंग्लज : गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील रब्बी हंगामातील उभी पिके वाचविण्यासाठी हिरण्यकेशी नदीवरील शेतीच्या पाण्यासाठीची उपसाबंदी अखेर ३४ दिवसांवरून २२ दिवसांवर आणण्यात आली. गडहिंग्लज तालुक्यातील यंदाची दुष्काळी स्थिती विचारात घेऊन उपसाबंदी कालावधी कमी करण्याची मागणी विविध पक्ष-संघटनांसह शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार उपासाबंदी कालावधी कमी करण्यात आला आहे. गडहिंग्लज पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नंदकुमार मोरे यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, ८ डिसेंबरला चित्री मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १३३४ द.ल.घ.फू.इतका होता. त्यापैकी आपत्कालीन परिस्थितीसाठी तीनशे द.ल.घ.फू.इतका पाणीसाठा राखीव ठेवण्याची तरतूद प्रकल्पाच्या अहवालात आहे.गडहिंग्लज व आजरा या दोन शहरांसह तालुक्यातील ६० ते ७० ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपुरवठा योजना आणि मर्यादित स्वरूपात शेतीला पाणी पुरविण्यासाठी हिरण्यकेशी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर ३४ दिवस उपसाबंदी लागू करण्यात आली होती.तथापि, उसासह रब्बी हंगामातील उभी पिके वाचविण्याच्या दृष्टिकोनातून उपसाबंदी कालावधी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ जानेवारीपर्यंत उपसाबंदी लागू राहील. त्यानंतर प्रकल्पातील पाणीसाठा आणि कार्यक्षेत्रीय परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपसाबंदी कालावधी निश्चित करणार आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)