दरम्यान, हुपरी पोलीस ठाण्यामध्ये कृती समिती आणि ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांत बैठक झाली. या बैठकीत यापुढे कोणत्याही घरगुती कनेक्शनच्या वीज बिलासाठी सक्ती किंवा कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळामध्ये थकीत वीज बिले वसुलीसाठी ‘महावितरण’कडून सक्ती करण्यात येत होती तर वीज खंडित करण्याची कारवाई सुरू केली होती. ही बाब पट्टणकोडोली कृती समितीच्या निदर्शनास येताच त्यांनी महावितरण कार्यालयात भेट देऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली. मात्र, तरीही ‘महावितरण’कडून ही कारवाई सुरुच ठेण्यात आली होती. या निषेर्धात संतप्त होऊन कृती समितीने पट्टणकोडोली ‘गाव बंद’ करण्याची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर गावातील व्यापारी व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवून बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याने कडकडीत बंद पाळण्यात आले. १५ पट्टणकोडोली बंद
फोटो ओळ : ‘महावितरण’च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सक्तीच्या वीज बिल वसुली व कनेक्शन तोडण्याच्या कारवाई विरोधात आज पट्टणकोडोलीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.