शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘ड’ वर्ग नियमावली कोल्हापूरला घातक

By admin | Updated: July 31, 2016 00:24 IST

आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांची भीती : न्यायालयात जाण्याचा इशारा

कोल्हापूर : ड वर्ग महापालिका अंतर्गत महाराष्ट्रामध्ये लागू होत असलेली नियमावली हरकतीचे मुद्दे लक्षात न घेता लागू केल्यास ती कोल्हापूरसाठी घातक ठरू शकते असा इशारा कोल्हापूर आर्किटेक्ट अ‍ॅन्ड इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी दिला आहे. या नियमावलीमुळे कोल्हापूर शहराच्या विकासावर काय परिणाम होऊ शकते हे त्यांनी आत्ताच निदर्शनास आणून दिले असून, त्यात बदल न झाल्यास असोसिएशन न्यायालयात जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. असोसिएशनची भूमिका अशी : राज्य शासनाने सर्व ‘ड’ वर्ग महापालिकासाठी बांधकाम नियमावली प्रसिद्ध करण्याचे निश्चित केले आहे. त्यातील कांही नियमावली संदर्भात असोसिएशने हरकती घेतल्या होत्या. १६ नोव्हेंबर १९९९ रोजी प्रसिद्ध झालेल्या विकास आराखड्याबरोबर विकास नियंत्रण नियमावलीही जाहीर झाली आहे व त्या अंतर्गत आजपर्यंत ७० ते ७५ टक्के विकसन जागेवर झाले आहे. त्याअंतर्गत यापूर्वी देण्यात आलेल्या परवानगीही कायदेशीर असल्याने सहा ते साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांना प्राप्त होणारा लाभांश नव्या टीडीआर नियमावलीने नाकारल्याने त्याचा नाहक भुर्दंड सामान्य जनतेला सोसावा लागणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे टीडीआर आणि पेड एफएसआय देण्यात यावा, अशी मागणी आर्किटेक्टस असोसिएशनच्या वतीने केली होती. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण हे आवश्यकच आहे; परंतू रुंदीकरणाबरोबरच त्या नवीन नियमावलीप्रमाणे रस्ता रुंदीच्या अंतर्गत लाभ मिळणारी ‘ड’ वर्गामध्ये खास बाब म्हणून कोल्हापूरसाठी तरतूदींचा शासनाने विचार करणेचे आहे. नव्या नियमावलीत प्रसिद्ध केलेल्या नियमांमुळे बांधकाम व्यावसायिकांना टीडीआर वापरणे न परवडणारे आहे. टीडीआर वापरून घराची किंमत कमी करता येणे शक्य होते; परंतु या नियमावलीमुळे हे अशक्य ठरणार आहे. याचा परिणाम म्हणून घराच्या किमती वाढतील. ‘टीडीआर’च्या नव्या धोरणामुळे आरक्षित जागांमध्ये टीडीआर घेण्याचे धाडस जमीनमालक दाखविणार नाहीत. त्यामुळे आवश्यक सुविधांसाठी आरक्षित जागा भरमसाट बाजारभावाने महापालिकेस विकत घ्यावी लागणार आहे. पर्यायाने हा आर्थिक बोजा नागरिकांच्या डोक्यावर लादला जाणार आहे. याची जाणीव शासनास आहे का, अशी विचारणाही असोसिएशनने केली आहे. (प्रतिनिधी) हद्दवाढ न झाल्याचा परिणाम कोल्हापूर शहराची आजपर्यंत एक इंचानेही हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध जागेवर विकसन करणे सक्तीचे झाले आहे; पण नव्याने आलेल्या नियमानुसार टीडीआर आणि पेड एफएसआयला बंधन घातल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होणार आहे. या नव्या नियमामुळे भविष्यात छोटी घरे, फ्लॅट यांच्या किमती भरमसाट वाढण्याचा धोका निर्माण होत आहे. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण हे आवश्यकच आहे; पण नवीन नियमावलीप्रमाणे रस्तारुंदीच्या अंतर्गत मिळणारी ‘ड’ वर्गामध्ये खास बाब म्हणून कोल्हापूरला सवलत देण्यात यावी, अशी सूचना असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअरिंग असोसिएशनने केलेली आहे.