शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांकडून शहराची लूट सुरूच

By admin | Updated: June 2, 2017 01:12 IST

चोरट्यांकडून शहराची लूट सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर / कळंबा : गेले दोन आठवडे सुरू असलेले घरफोडीचे सत्र बुधवारी रात्रीही कायम राहिले. बोंद्रेनगर परिसरातील न्यू कणेरकरनगर, हनुमान मंदिर भागात चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोयंडे उचकटून तब्बल ११ घरफोड्या केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. दोन घरातील पाच तोळे सोन्याचे दागिने आणि २५ हजार रुपये चोरी झाल्याचे स्पष्ट झाले, तर तीन घरांमध्ये कोणी नसल्यामुळे किती मुद्देमाल चोरीला गेला, हे समजू शकले नाही. या घरफोड्यात सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, हा घरफोडीचा प्रकार समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने शेजारच्या शेतवडीतून माग काढला.उन्हाळी सुटीमुळे येथील बहुतांश कुटुंबे ही आपल्या मूळ गावी गेल्याने त्यांची घरे बंद होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला. गवंडी काम करणारे नागेश साताप्पा कदम यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून तिजोरीमधील सुमारे तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २० हजार रुपये चोरल्याचे स्पष्ट झाले. कदम हे मुलीच्या विवाहनिमित्त गर्लगुंजी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे गेले होते, तर मूळचे उस्मानाबाद येथील नागनाथ शांतिनाथ कांबळे कुटुंबासमवेत गावी गेले होते. त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दोन तोळे दागिने व पाच हजार रुपये असा मुद्देमाल चोरट्यांनी नेला.रिक्षा व्यावसायिक नुरुला इस्माईल शेख यांच्याही बंद घरातील २५ हजार रुपयांचा कॅमेरा व मोबाईल चोरून नेला आहे. रमजानचे रोजे सुरू असल्याने ते सदर बाजार येथील आपल्या दुसऱ्या घरी गेले होते, तर त्यांची पत्नी आजारी असल्याने खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आनंदा शामराव वागरे हे कुटुंबासमवेत सुटीसाठी आपल्या गावी करंजफेण (ता. राधानगरी) येथे गेले होते. त्यांच्या घरामधील तीन हजार रुपये आणि चांदीचे आरतीचे ताट लंपास केले. हनुमान मंदिर येथे राहणारे मूळचे भोगमवाडी (ता. करवीर) येथील राजेश ज्ञानदेव भोगम यांच्या घरातील तिजोरी उचकटली; पण चांदीची लगड व भांडी असे कोणतेही चांदीचे साहित्य नेले नाही. धनाजी केरबा पाटील (मूळ गाव महे, ता. करवीर) यांच्या घराचा दरवाजा उचकटला, पण हाती काही लागले नाही. रामकृष्ण शंकर जाधव (मूळ गाव केळोशी खुर्द, ता. राधानगरी) यांच्या घरातील दीड हजार रुपयांचे ब्रेसलेट व ५०० रुपये लांबविले. उमेश कांबळे यांच्या घरातील तिजोरी फोडली; पण हाती काही लागले नाही. त्याचबरोबर सर्जेराव पाटील (मूळ गाव कुदळवाडी, ता. राधानगरी) यांच्या घरातच चांदीचा कारखाना आहे. त्यांच्या घराचे कुलूप उचकटले, पण चोरट्यांना या ठिकाणीही काही मिळाले नाही. तेथूनच पुढे शेतवडीकडे असलेल्या अशोक नारायण लोंढे यांच्या दुमजली घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. त्यांचे पहिल्या मजल्यावर कागदाचे गोदाम आहे. ते फोडले, पण काही मिळून आले नाही. मूळचे धामोड येथील चांदी व्यावसायिक युवराज पिलावरे हे या ठिकाणी भाड्याने राहतात. त्यांच्या घरातही चोरी झाली. या घटनांची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली आहे.बॅग विक्रेता रडारवरगेले तीन दिवस या भागात एक बॅग विक्रेता मंदिराजवळील असलेल्या मंडळाच्या शेडजवळ बसायचा. त्याची वर्तणूक संशयास्पद होती, असे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, या परिसरातील कृष्णात वरुटे व प्रवीण श्रीपती पाटील यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी गुरुवारी दुपारी घेतले. वरुटे यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा बॅग विक्रेता दिसून येतो. त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहे.टोळीची शक्यताकोल्हापूर शहरात व उपनगरांत चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून घरफोड्या करून पोलिसांना हैराण केले आहे. त्यामुळे ही चारहून अधिकजणांची टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.चोरीची पिशवी दुसऱ्याच्या घरात टाकलीचांदीचे साहित्य असलेली पिशवी चोरट्यांनी आनंदा वागरे यांच्या घरामध्ये टाकली होती. चोरट्यांनी ती पिशवी उघडली नव्हती. ही पिशवी पाहताच वागरे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले.