शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

शहराची उडाली ‘धूळ’दाण

By admin | Updated: December 5, 2014 00:51 IST

धूळीचे प्रमाण पाचपट : चिपळूण येथील प्रादेशिक प्रयोगशाळेच्या अहवालात निष्कर्ष; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कोल्हापूर : चिपळूण येथील प्रादेशिक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात कोल्हापूर शहरातील धुळीचे प्रमाण पाचपटींनी वाढल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. हवा प्रदूषण नियमन कायद्यान्वये हवेतील धुळीची मर्यादा १५० ४ॅ/े3 आहे; पण प्रयोग शाळेच्या अहवालात कोल्हापुरातील हे प्रमाण सुमारे ७०० ४ॅ/े3 इतके असल्याचे आढळून आले आहे़ यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे़ कॉमन मॅन संघटनेच्या मागणीनुसार कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने ४ नोव्हेंबरला रंकाळा येथील जावळाचा गणपती चौक, चप्पल लाईन आणि राजारामपुरी येथे एचव्हीएस मशीन्स ठेवली होती़ सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत या मशीन्सद्वारे नमुने संकलित करण्यात आले. हे नमुने ५ नोव्हेंबरला प्रदूषण मंडळाने चिपळूण येथील प्रादेशिक प्रयोगशाळेत पाठविले़ या नमुन्यांचा अहवाल प्रदूषण मंडळाला नुकताच प्राप्त झाला असून, त्यामध्ये शहरातील धुळीचे प्रमाण कायद्यात नमूद केलेल्या प्रमाणापेक्षा पाचपट जास्त असल्याचे आढळून आले आहे़ हा अहवाल महानगरपालिकेस पाठविण्यात आला असून, महानगरपालिका याबाबत आता काय उपाययोजना करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे़ शहरात अंदाजे ६०० किलोमीटरचे रस्ते असून, त्यांची दुरवस्था झाली आहे़ या रस्त्यांवरून वाहनांची ये-जा होताना मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण होते़ या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आणि डोळ्यांचे आजार होत आहेत़ या पार्श्वभूमीवर कॉमन मॅन संघटनेच्या बाबा इंदुलकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती़ शहर धुळीने माखण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उखडलेले रस्ते व डांबरीकरण न केलेले रस्ते. शहराच्या कोणत्याही भागात गेले तरी धुळीचा त्रास होतोच. शहरात कुठे ना कुठे ड्रेनेज, जलवाहिनीची कामे सुरू असते. त्यासाठी रस्ता उकरला जातो. काम झाल्यावर मातीचा ढीग तसाच ढकलून दिला जातो. अशा कामांसाठी उकरलेला रस्ता किती दिवसांत डांबरीकरण करायचा याचे कोणतेही नियोजन महापालिकेकडे नाही. त्यामुळे या मातीवरून वाहने गेली की त्याचा धुरळा उडतो. अनेक भाग असे आहेत की जिथे कित्येक वर्षात रस्त्याला डांबरच लागलेले नाही. त्यामुळे अशा रस्त्यावरून वाहने गेली किंवा मुख्यत: केएमटी बस गेली की हवेत धुळीचा लोट उसळतो. एकदोन वेळा अशा धुळीचा अनुभव घेतला की तुम्ही आजारी पडलाच म्हणून समजा हे ठरलेले असते. डांबरी रस्ता केल्यानंतर कंत्राटदार त्यावर क्रशर पीठ टाकतो. डांबराचा वापर कमी झाला असल्याने या पीठाचाही धुरळा कांहीदिवस उडत राहतो. म्हणजे रस्ता होऊनही धूळ लोकांची पाठ काही सोडत नाही. धुळीमुळे श्वसनाचे विकारवातावरणातील प्रमाणापेक्षा अधिक धूळ मानवी आरोग्यास घातक आहे. धुळीमुळे धाप लागणे व श्वसनाने विकार जडतात तसेच योग्य काळजी न घेतल्यास डोळे व त्वचेच्या विकारांनाही निमंत्रण मिळते. ‘अ‍ॅलर्जी’ असलेल्या व्यक्तींना धुळीपासून अधिक धोका असतो. सातत्याने धुळीच्या संपर्कात राहिल्यास सुदृढ व्यक्तींनाही श्वसनाचे आजार जडू शकतात. धुळीच्या रस्त्यांवरून प्रवास करताना नाक व तोंडाला स्वच्छ रूमाल बांधा. सातत्याने धुळीत जाणे टाळा, योग्यवेळी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. - डॉ. उमेश कदम, जनरल फिजिशियनकारखाना किंवा विशिष्ट जागेतील हवेचे प्रदूषण असल्यास संबंधित आस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नोटीस पाठवली जाते किंवा कारवाईची शिफारस केली जाते. परंतू शहरातील अशा प्रकारच्या प्रदूषणास रस्ते,वाहने अशी विविध घटक कारणीभूत असतात. त्यामुळे त्यास एकट्या महापालिकेस जबाबदार धरता येत नाही.- एस.एस.डोकेप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर.येथे सुरू आहेत कामे जावळाचा गणपती ते रंकाळा स्थानकसर्किट हाऊस ते ड्रेनेज प्लँटवाय. पी. पोवारनगरराजारामपुरी मेन रोडस्टेशन रोडजरगनगरसेनापती बापट रस्ता विद्यापीठ रोडकदमवाडी ते भोसलेवाडी चौकरेणुका मंदिर ते शाहू जन्मस्थळसाई मंदिर ते फुलेवाडी नाकाटिंबर मार्केट ते राज क पूर पुतळायल्लमा मंदिर ते जवाहरनगर काम सुरू, पण कासवगतीनेकोल्हापूर : सध्या सुरू असलेल्या शहरातील रस्त्यांच्या कामाबाबत पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, ठेकेदार व प्रशासन यांच्यात ताळमेळ नसल्याने दोन दिवसांच्या कामाला पंधरा दिवस लागत आहेत. ‘काम सुरू, रस्ता बंद’ असे शहरातील बहुतांश रस्त्यांवरील चित्र आहे. शहरातील १५०हून अधिक रस्त्यांची दुरुस्ती व बांधणी हाती घेतली आहे. रस्त्यांचे काम वेळेत सुरू झाले असले तरी समन्वयाअभावामुळे रखडण्याची शक्यता आहे. रस्त्याचे काम रात्रीच्या वेळेत व जलद गरजेचे असताना तसे कासवगतीने सुरू आहे.महापालिकेने सात रस्त्यांवर दुरुस्तीमुळे वाहतुकीस अडथळा होणार असल्याचे पत्राने कळविले आहे. याठिकाणी वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी बॅरिकेटस् व इतर व्यवस्था केली आहे. शहरातील रस्ते चकाचक झाल्यानंतर त्याचा फ ायदाच होणार असल्याने वाहनधारकांनी सहकार्य करावे. - आर. आर. पाटील (निरीक्षक शहर पोलीस वाहतूक शाखा)