शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

मुरगूड शहर झाले हागणदारीमुक्त

By admin | Updated: October 30, 2015 23:25 IST

पालिका सभेत घोषणा : पाण्याच्या टँकरचे भाडे वाढविण्याचा निर्णय, प्लास्टिक पिशव्यांवरही जोरदार चर्चा

मुरगूड : शासनाच्या आदेशान्वये नगरपरिषद हद्दीमध्ये उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून, अशा कुटुंबांना शौचायल बांधण्यास अनुदान देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्याचा पूर्णपणे प्रतिंबंध केल्याने आणि सध्या शहरातील कोणीही उघड्यावर शौचास बसत नसल्याने मुरगूड शहर हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा सर्वसाधारण सभेत करण्यात आली. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये झालेल्या मुरगूड पालिका सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रेखा सावर्डेकर होत्या. मुख्याधिकारी बी. एस. जगताप, शहर अभियंता प्रकाश पोतदार, सूर्याजी भोपळे, अनिल गंदमनवाड, मारुती शेट्टी, अशोक तांबट, दिलीप कांबळे,आदी अधिकाऱ्यांनी सभागृहाला शासकीय माहिती पुरविली. पालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदीच्या मोहिमेबाबत विरोधी पक्ष नेता किरण गवाणकर यांनी आक्षेप घेत, व्यापाऱ्यांची बाजू उचलून धरली. पालिकेने जप्त केलेल्या प्लास्टिक पिशव्या ह्या कशावरून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या, असा प्रश्न उपस्थित करून दुकानावर धाडी टाकण्याअगोदर पालिकेने तशा आशयाची नोटीस पाठवावी, अशी मागणी ही त्यांनी केली. शिवाय शासनाने प्लॉस्टकविरोधी अध्यादेश काढला आहे का, अशी विचारणा केली. दिवाळीपर्यंत परत कारवाई न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. मुख्याधिकारी बी. एस. जगताप यांनी शासनाच्या आदेशान्वयेच आपण कारवाई केल्याचे सांगत, तशा पद्धतीची नोटीस दुकानदारांना दिल्याचेही सांगितले. याशिवाय पालिकेकडील आस्थापनावरील वेतन व नियमित वेतन यांच्यावरील थकीत लाभाची रक्कम १३ व्या वित्त आयोग अनुदानातून देण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. याला अनुसरून कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली. याशिवाय पालिकेकडून कचरा शुल्क मासिक पाच रुपयांप्रमाणे नागरिकांकडून आकारणी केली जात होती. याबाबात प्रशासनाने सदरची आकारणी ३० रुपये करण्याला मान्यता देण्यात आली. एकनाथ मांगोरे यांनी लोखंडी तिरडीची सोय करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष अजितसिंह पाटील, संतोष वंडकर, दगडू शेणवी, परेश चौगले, किरण गवाणकर, सुहास खराडे, वसुधा कुंभार, माया चौगले, नम्रता भांदिगरे, गौराबाई सोनुले, फुलाबाई कांबळे, अनिता भोसले, सुजाता पाटील, वैशाली सुतार, रूपाली सणगर, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)१०० रुपयांची वाढ : प्रतिटँकर ३०० रुपयेपालिकेकडून शहरातील सार्वजनिक अथवा घरगुती कार्यक्रमासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविले जातात. यासाठी टँकरचा खर्च म्हणून प्रतिटँकर २०० रुपये आकारणी केली जात होती. सध्याच्या तुलनेत ही आकारणी कमी असल्याने २०० ऐवजी प्रति टँकर ४०० रुपये आकारणी करण्याबाबत चर्चा झाली. सर्वानुमते १०० रुपयांची वाढ निश्चित करून प्रति टँकर ३०० रुपये आकारणी ठरविण्यात आली.