शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणात शहर पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात ग्रामीण भागाने आघाडी घेतली आहे. ग्रामीण भागात आजवर ७७ टक्के लसीकरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात ग्रामीण भागाने आघाडी घेतली आहे. ग्रामीण भागात आजवर ७७ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, हेच प्रमाण कोल्हापूर शहरात केवळ ३८ टक्के इतके आहे. आरोग्य कर्मचारी व पोलीस, महसूल महापालिका, नगरपालिका, पंचायतराज असे फ्रंट लाइन वर्कर असे मिळून आजवर २८ हजार ६७७ कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असून, ते टार्गेटच्या ४४ टक्के आहे. त्यामुळे गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लसीकरण वाढवण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर सोपवली असून, त्याचा कार्यालयनिहाय अहवाल बनवावा, असे निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात कोरोना लसीकरण मोहीम जिल्हा कृती दल समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. फारूख देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून आजअखेरचा अहवाल दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, प्रत्येक विभाग प्रमुखाने नोंदणी झालेल्या अधिकारी-कर्मचारी यांचे समुपदेशन करावे. त्यांचे लसीकरण होईल याची जबाबदारी पार पाडावी. आरोग्य विभागाने लसीकरणाबाबत समुपदेशनावर भर द्यावा. जिल्ह्यात जास्तीत-जास्त लसीकरण होईल, याबाबत सर्वांनी प्रयत्न करावा.

----

लसीकरणासाठी ३४ हजार ९६७ आरोग्य कर्मचारी व २९ हजार ८२१ फ्रंट लाइन वर्कस असे ६४ हजार ७८८ कर्मचाऱ्यांचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले होते. त्यापैकी लसीकरण झालेले कर्मचारी असे

आरोग्य कर्मचारी : २३ हजार ६३३ (६८ टक्के)

फ्रंट लाइन वर्कर्स : ५ हजार ४४४ (३४ टक्के)

--

ग्रामीण भागातील कर्मचारी : १९ हजार ४३२ (५८ टक्के)

कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील कर्मचारी : ९ हजार २४५ (४८ टक्के)

---

१ ते ८ मार्च दरम्यान राष्ट्रीय जंतनाशक मोहीम, दहा लाख मुलांना लाभ

१ ते १९ वयोगटांतील सर्व मुला-मुलींना जंतुनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे. पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे यासाठी १ ते ८ मार्च या कालावधीत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील दहा लाख मुलांना होणार आहे. याबाबतदेखील बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच ऊसतोड कामगार आणि वीट भट्टी कामगारांच्या मुलांनाही या मोहिमेचा लाभ दिला जावाव तशी कार्यवाही करावी, अशी सूचना केली. सध्या अंगणवाडी व शाळा बंद असल्याने अंगणवाडी व आशासेविकांमार्फत या जंतुनाशक गोळ्या मुलांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.

----

फोटो नं २५०२२०२१-कोल-कोरोना लसीकरण

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना लसीकरण आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, डॉ. योगेश साळे, डॉ. अनिल माळी, डॉ. फारुख देसाई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

---