शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नागरिकांनी भरला ५ कोटी ४० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

कोल्हापूर प्रशासनाने वारंवार सांगूनही कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना काळात अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. ...

कोल्हापूर प्रशासनाने वारंवार सांगूनही कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना काळात अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. परिणामी या सर्वांकडून प्रशासनाने तब्बल ५ कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर हा संसर्गाद्वारे होणारा आजार असल्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. सुरुवातीच्या काळात अनेकांनी या निर्णयाला चांगला प्रतिसाद दिला. मात्र हळूहळू जसे लॉकडाऊन वाढत जाईल तसतसे नागरिकांचा संयम सुटला. आॅक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोरोनाचा कहर कमी झाला होता. त्यामुळे मास्क वगळता अन्य बंधने नव्हती. मात्र उर्वरित वर्षभरासाठी अनेक बंधने लादल्यामुळे कंटाळलेल्या नागरिकांनी अनेक बंधने झुगारली.

या सगळ्याच परिणाम म्हणजे प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागली. संचारबंदी जाहीर झाली असताना विनाकारण वाहनांवरून फिरणे, वाहन चालक परवाना नसणे, मंडईत मास्क न लावता भाजी विक्रीसाठी बसणे, रस्त्यांवर मास्क न वापरता फिरणे, विनापरवाना दुकाने उघडणे, विवाह समारंभांचे आयोजन करणे अशासारख्या अनेक नियमांचा भंग केल्याप्रकरणी विविध पातळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी केलेल्या या कारवाईमध्ये आतापर्यंत तब्बल २ लाख ५० हजार ९०२ प्रकरणांमध्ये ५ कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचना गांभिर्याने घेतल्या नसल्याचेच हे द्योतक आहे. पोलिसांनी तर ज्या वेळी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली तेव्हा गाडीवरून फिरणाऱ्यांच्या गाड्या जप्त करून लॉकडाऊन उठल्यानंतर परत केल्या होत्या. एवढे असूनही अनेकजण घरात बसत नाहीत हे वास्तव आहे.

चौकट

स्थानिक स्वराज्य संस्था, विभाग एकूण प्रकरणे वसूल दंड

महानगरपालिका २७,१४३ १ कोटी ७२ लाख ३१ हजार ८३५

ग्रामपंचायतींमार्फत १४,५२६ ३२ लाख ९० हजार ५५०

पोलीस विभाग १, ९२, ४१९ २ कोटी ९८ लाख ८६ हजार ८७०

नगरपालिका १६७१३ ३५ लाख ८९ हजार १२०

एकूण ७१८२६/१,७९,०७६ ५ कोटी ३९ लाख ९८ हजार ३७५