शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सर्किट बेंचप्रश्नी आंदोलन स्थगित

By admin | Updated: April 1, 2015 00:31 IST

जिल्हा बार असोसिएशनचा निर्णय : चंद्रकांतदादांच्या घरासमोर धरणार होते धरणे

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, याप्रश्नी सोमवारी (दि. ६) पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानावर पुकारण्यात आलेले धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मंगळवारी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. खंडपीठ कृती समितीच्या सहा जिल्ह्यांतील सदस्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी गत आठवड्यात सहा जिल्ह्यांच्या खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने कऱ्हाड येथील सभेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानावर सहा एप्रिलला धरणे आंदोलन करण्याचा ठराव केला होता. त्यानंतर २६ मार्चला पालकमंत्री पाटील व भाजपचे महानगर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईत चर्चा झाली. येथे झालेल्या चर्चेमध्ये पुढील दोन कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ठराव करण्यासंबंधी मिळालेली हमी या पार्श्वभूमीवर खंडपीठ कृती समितीने कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत चर्चा केली.यावेळी खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, सर्किट बेंचसाठी कॅबिनेटचा ठराव करण्यासाठी प्रस्तावावर सही करून पाठविला आहे. त्यामुळे सोमवारी (दि.६) आंदोलन करणे योग्य होणार नाही. तसेच पुढील दोन कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री सर्किट बेंचच्या ठरावावर निर्णय घेतात की नाही, त्याची प्रतीक्षा करावी. त्यानंतरच यावर सकारात्मक निर्णय घ्यावा. परंतु, १७ एप्रिलला मुंबई येथे आझाद मैदानात आंदोलन व उपोषण होईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. तथापि, हा निर्णय सहा जिल्ह्यांतील कृती समितीचे सदस्य असलेल्या जिल्हा व तालुका बारच्या अध्यक्षांना कळवून त्यांच्याशी चर्चा व विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ठरले.सभेला अ‍ॅड. एम. डी. आडगुळे, अ‍ॅड. संपतराव पवार, अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. शिवाजी राणे, अ‍ॅड. दीपक पाटील, अ‍ॅड. पी. जे. पोवार, अ‍ॅड. पी. एस. भावके, अ‍ॅड. प्रकाश मोरे, आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष अ‍ॅड. के. व्ही. पाटील यांनी आभार मानले.