शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नाताळ : आनंद आणि उल्हासाचा सण...

By admin | Updated: December 24, 2014 00:25 IST

२५ डिसेंबरची रात्र ही तुलनेने मोठीच या रात्रीत मेणबत्त्या पेटवाव्यात, आनंदोत्सव साजरा, हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस.

येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ६ जानेवारीऐवजी २५ डिसेंबर मानावा, असा निर्णय सुमारे साडेसोळाशे वर्षांपूर्वी पोप यांनी दिला. तेव्हापासून हा दिवस ख्रिसमस (नाताळ) म्हणूून साजरा केला जातो. ख्रिसमसचा मूळ अर्थ म्हणजे येशूच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना. गुरूवार, दि. २५ रोजी नाताळ साजरा होत आहे. त्यानिमित्त...नाताळ सण म्हणजे २५ डिसेंबर. आपल्या अमावास्या, पौर्णिमा या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात, तसा प्रकार इसवीसनाच्या ख्रिस्ती कालगणनेत नाही. तिथे सूर्यभ्रमणालाच अधिक महत्त्व आहे आणि २५ डिसेंबरला आपले सूर्य नेहमीपेक्षा थोडा कमीच वेळ दर्शन देत असतो.२१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस. दिवस छोटा याचा अर्थ रात्र मोठी. त्यामुळे २५ डिसेंबरची रात्र ही तुलनेने मोठीच असणार. या मोठ्या रात्रीत मेणबत्त्या पेटवाव्यात, आनंदोत्सव साजरा करावा, असे कोणाला वाटले तर ते योग्यच ठरेल. शिवाय हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. आता येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा दिवस मानला जात असला तरी, पूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ६ जानेवारी मानला जात असे. जवळपास साडेसोळाशे वर्षांपूर्वी त्यावेळच्या पोप यांनी हा दिवस २५ डिसेंबर मानावा, असा निर्णय दिला. त्यांनी येशू ख्रिस्ताचा जन्मदिन २५ डिसेंबर रोजी साजरा करावा, असे फर्मान काढले आणि त्यावेळेपासून हा दिवस २५ डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला. जगभरातील ख्रिस्त अनुयायी या दिवशी आनंद व्यक्त करतात. साधू, संत, महात्मे यांची जयंती साजरी करण्याची प्रथा आणि परंपरा सर्व जगभर पाळली जाते.जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात ख्रिसमसचा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर या धर्ममताचे काही अनुयायी, काही पंथ हे मात्र २५ डिसेंबरच्या सायंकाळी हा दिवस साजरा करतात. भारतीय धर्म-संस्कृतीशी ऋणानुबंध जोडून दाखविणारा आणखी एक विशेष या २५ डिसेंबरशी निगडित आहे. प्राचीन काळात रोम राज्यात २५ डिसेंबर हा दिवस सूर्याची जयंती म्हणून मानला जात होता.काळोख म्हणजे अंधार हा माणसाला भयप्रद वाटतो. तो जणू आपला शत्रू आहे, अशी भावना माणसाच्या मनात पूर्वापार रुजलेली आहे. अंधार दूर करून सगळीकडे प्रकाशाची उधळण करीत वावरणारा सूर्य म्हणजे आपला मित्र वाटतो. सूर्याचे एक नावच मुळी ‘मित्र’ असे आहे. आपली धर्मसंस्कृती सूर्यपूजक आहे. २५ डिसेंबर या दिवशी प्राचीन रोम संस्कृतीने सूर्याशी जसे नाते जोडून ठेवले, त्याचप्रमाणे मोठ्यात-मोठ्या दिवसाशी आपल्या मोठ्यात-मोठ्या सणाचे नाते जोडून ख्रिस्तानुयायांनी एक सांधा जोडून घेतला आणि जाणता-अजाणता त्यांच्याकडून जोडला गेला, असे म्हटले पाहिजे. ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणारा आणि आनंदोल्हासाचा सण असणाऱ्या नाताळचा अर्थात ख्रिसमसचा मूळ अर्थ आहे, ख्राईस्ट मास. याचा अर्थ येशूच्या (ख्रिस्त) जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना. पण नाताळ केवळ प्रार्थनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक सण झाला आहे. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षोल्हासाने साजरा केला जातो. ख्रिस्तापूर्वी रोम राज्यात पंचवीस डिसेंबरला सूर्यदेव डायनोसियसच्या प्रार्थनेसाठी मोठा उत्सव होत असे. इसवीसनाच्या पहिल्या शतकात लोक येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबरला साजरा करू लागले. पुढे या उत्सवाची परंपरा निर्माण झाली.२४ व २५ डिसेंबरच्या दरम्यानची रात्र येशूच्या आराधनेत जागवली जाते. दुसऱ्यादिवशी सकाळीच जन्मोत्सव साजरा केला जातो. एकमेकांची गळाभेट घेऊन लोक परस्परांना शुभेच्छा देतात. प्रसाद ग्रहण केला जातो. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री सजविला जातो. लखलखत्या दिव्यांची तोरणे घराघरांना, चर्चेसला लागतात.खरे तर सध्या साजरा केला जातो तशा पद्धतीचा ख्रिसमस १९ व्या शतकात साजरा व्हायला लागला. ख्रिसमस ट्री पूर्वी फक्त जर्मनीत असायचे. ख्रिसमसमध्ये कॅरोल्सचा समावेश ब्रिटनमध्ये प्रिन्स अल्बर्टने केला होता. यादिवशी आतषबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली. १८४६ मध्ये ख्रिसमर्स कार्ड बनविले गेले. १८७० पर्यंत त्याचा प्रसार सर्वत्र झाला. सांताक्लॉजचा उल्लेख १८६८ मध्ये एका नियतकालिकात वाचायला मिळतो.