शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

नाताळच्या पूर्वसंध्येला उत्साहास उधाण, बाजारपेठ सजली

By admin | Updated: December 25, 2016 00:02 IST

तयारीची लगबग : चर्चमध्ये आज प्रार्थना, विशेष उपासना सभा, जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : घरोघरी ख्रिसमस ट्रीची सजावट, चर्चना आकर्षक विद्युत रोषणाई, केक-चॉकलेटस्ची धूम, सांताक्लॉजची वेशभूषा, आकर्षक गिफ्ट पॅकिंग, जिंगल बेलची गाणी अशा पद्धतीने शहरातील वातावरण शनिवारी नाताळमय बनले. ख्रिस्तीबांधवांची दिवसभर नाताळ सणाच्या तयारीची लगबग सुरू होती. आज, रविवारी शहरातील विविध चर्चमध्ये प्रार्थना, विशेष उपासना सभांचे आयोजन केले आहे.नाताळ प्रेषित येशूंचा जन्मदिन म्हणून तो साजरा केला जातो. या सणाचा आनंद द्विगुणित करताना महाद्वार रोड, पापाची तिकटी येथील बाजारपेठेत विविध ख्रिसमस ट्री, सजावटीचे साहित्य, केक-चॉकलेट्स, आप्तेष्टांना देण्यासाठी भेटवस्तूंची खरेदी करण्यास गर्दी झाली होती. त्यात फूड गिफ्टस्, गिफ्ट बास्केटस्, ख्रिसमस कार्डस् अशा वस्तूंसह विविध वस्तूंचा समावेश होता. बच्चेकंपनीस भेटवस्तू देण्यासाठी खेळण्यांच्या दुकानांतही पालकांची गर्दी होती. ख्रिस्तीबांधवांच्या घरामध्ये करंजी, लाडू, चकली आणि चिवड्यासह दोदोल, बिबिंका, करमला, बॉलिना, दोस, पिनाका, स्नोबॉल कुकीज अशा फराळाची रेलचेल सुरू होती. अधिकतर जणांनी तयार फराळ खरेदीला प्राधान्य दिले आहे. ख्रिसमस केक, प्लम केक, रम केक अशा केकची आॅर्डर देण्यासाठी ख्रिस्ती बांधवांची शहरातील विविध केक शॉप, बेकरींत गर्दी दिसून आली. केक्स, पेस्ट्री, शॉप्समध्ये १८ ते २० विविध फ्लेवर्समध्ये चॉकलेट बॉक्स उपलब्ध आहेत. त्यावर सांताक्लॉज, स्मॉल हाऊसेस, जिंगल बेल्स, गवताळ कुरण, बायबलमधील प्रसंग साकारले आहेत. नागाळा पार्कमधील ख्राईस्ट चर्च, कसबा बावड्यातील सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्स चर्च, रेसिडेन्सी क्लब येथील आॅल सेंट चर्च, होलिक्रॉस चर्च, शिवाजी पार्कमधील सेवंथ डे अ‍ॅडव्हॅनटिस्ट चर्च, विक्रमनगरमधील ख्रिश्चन चर्च तसेच ब्रह्मपुरीतील पवित्र उपासना मंदिर या चर्चमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)विशेष उपासना सभा आज ख्रिसमसनिमित्त आज, रविवारी न्यू शाहूपरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये विशेष उपासना सभा होणार आहे. सकाळी ८ वाजता इंग्रजी उपासना, सकाळी ९.४५ वाजता पहिली मराठी उपासना, सकाळी ११.४५ वाजता दुसरी मराठी उपासना, दुपारी १२.३० वाजता तिसरी मराठी उपासना होणार आहे. सायंकाळी ६ वाजता महापालिकेजवळील शहर उपासना मंदिरात ख्रिस्त जन्मदिनाची मराठी उपासना होईल. या उपासनेमध्ये रेव्ह. जे. ए. हिरवे, डी. बी. समुद्रे हे मार्गदर्शन करतील.