शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी पोलिसाला चोप

By admin | Updated: May 20, 2016 01:18 IST

मिरजकर तिकटी चौकातील घटना : कपडे फाटेपर्यत मारहाण

कोल्हापूर : मद्यप्राशन करून फुकटचे खाणाऱ्या पोलिसाला नागरिकांनी कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करण्याचा प्रकार गुरुवारी रात्री उशिरा मिरजकर तिकटी चौकात घडला. नागरिकांनी त्याची चारचाकी गाडीही काढून घेतली होती. रात्री उशिरा त्याला नागरिकांनीच जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.एक पोलिस मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आपल्या मारुती मोटारीतून रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मिरजकर तिकटी येथील चौकात आला. त्याने चौकातील हातगाडीवर आइस्क्रीम खाल्ले; पण पैसे न देताच जाताना आइस्क्रीम हातगाडीचालकाने त्याच्याकडे पैसे मागितले असता ‘त्या’ मद्यपी पोलिसाने त्या हातगाडीचालकाला शिवीगाळ करून त्याच्या गाडीवर लाथा-बुक्क्या मारून धिंगाणा घातला. गोंधळ माजल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी या पोलिसाला समजावण्याचा प्रयत्न केला; पण त्याने नागरिकांनाही नशेत शिव्या दिल्याने ते संतप्त झाले. त्यांनी या फुकटखाऊ पोलिसास मारहाण केली. त्यावेळी त्याने आपण पोलिस असल्याचा धाक दाखविला. त्यानंतरही नागरिकांनी त्याला कपडे फाटेपर्र्यंत बेदम चोप दिला. चौकात गोंधळ वाढल्याने परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निवासराव साळोखे व अशोकराव पोवार यांनी त्या पोलिसाची नागरिकांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर जुना राजवाडा पोलिसांत फोन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी आले व ‘त्या’ मद्यपी पोलिसाला ताब्यात घेऊन गेले. संबंधित पोलिस शहरातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.दरम्यान, त्या पोलिसाची पांढऱ्या रंगाची मारुती गाडी चौकातच उभी होती. नागरिकांनी त्या गाडीची तपासणी केली असता त्या पोलिसाचा ड्यूटीवरील गणवेश तसेच काचेजवळ ‘पोलिस’ असे लिहिलेली पाटी सापडली. त्यामुळे संतप्त नागरिकांकडून त्या मोटारीचे नुकसान होऊ नये म्हणून पुन्हा पोलिसांना पाचारण करून ती मोटार नेण्यास भाग पाडले.(प्रतिनिधी)भांडणे सोडविण्यासाठी पाठविल्या दोन महिला पोलिस!जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रात्रीच्या वेळी पुरुष पोलिस अशा प्रसंगी कदाचित नसावेत, असा अनुभव याप्रसंगी नागरिकांना आला. पोलिसाला बेदम मारहाण केल्यानंतर साळोखे व पोवार यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फोन केल्यानंतर काही वेळात घटनास्थळी दोन महिला पोलिस आल्या. विशेष म्हणजे, त्या दोन महिला पोलिसांनी नागरिकांनाच दमदाटी करण्यास प्रारंभ केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून बोलाविण्यात आले.