शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ग्रामसभेत होणार लाभार्थीची निवड

By admin | Updated: August 22, 2016 00:32 IST

कुणाल खेमनार : ‘प्रधानमंत्री आवास’च्या प्राधान्यक्रम याद्यांची तयारी

कोल्हापूर : सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण - २०११ नुसार ‘प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण’ची प्राधान्यक्रम याद्यांची तयारी सुरू झाली आहे. गावसभेपुढे सक्षम अधिकाऱ्यांसमोर नावे जाहीर करून याद्या तयार केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पत्रकातून दिली. ग्रामपंचायत व संवर्गनिहाय याद्या ग्रामविकास विभागाकडून उपलब्ध करून दिल्या आहेत. तालुकास्तरीय कमिटीने यादीनुसार निकषांनुसार घरांची तपासणी करून प्रस्ताव जिल्हास्तरीय कमिटीकडे सादर केले जाणार आहेत. गावसभेपूर्वी आठ दिवस पात्र यादी सूचनाफलकावर प्रसिद्ध करावयाची आहे. गावसभेत गटविकास अधिकारी, पंचायत समितीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत यादी ठेवावी. अपात्र कुटुंबांची नावे वगळून संवर्गानुसार स्वतंत्र यादी करताना मूळ यादीतील प्राधान्यक्रम अबाधित ठेवावा लागणार आहे. प्राधान्यक्रमाचे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. कुणाल खेमनार यांनी पत्रकातून केले आहे. ग्रामसभेने सुचविलेल्यांचीही यादी होणार उपलब्ध प्राधान्यक्रम यादीमध्ये समावेश नसलेल्या; पण प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामसभेने सुचविलेल्या नवीन कुटुंबांच्या संवर्गनिहाय स्वतंत्र याद्या कारणासहीत तयार करण्याच्या सूचनाही ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. ग्रामसभेने न सुचविलेले लाभार्थीही सहा महिन्यांत अपील करू शकतात. लाभार्थ्यांच्या घराचे निकष गवत, पेरू (कूड), बांबू, प्लास्टिक, पॉलिथिन, कच्च्या विटांच्या भिंती व लाकूड, चुन्याचा वापर न केलेले दगडी भिंतींचे बांधकाम असावे. तसेच गवत, कूड, बांबू, प्लास्टिक, पॉलिथीन, हातांनी तयार केलेली कौले असे छप्पर असावे. प्राधान्यक्रम यादीसाठीचे निकष ४कुटुंबात १६ ते ५९ वयोगटातील एकही प्रौढ व्यक्ती नसणे. ४१६ ते ५९ वयोगटातील एकही पुरुष नसणारे, महिला कुटुंबप्रमुख. ४२५ वर्षांहून अधिक वय असणारा प्रौढ साक्षर असा एकही सदस्य नसणारे कुटुंब. ४अपंग कुटुंब सदस्य असणारे व सक्षम सदस्य नसणारे कुटुंब. ४मानवी श्रमाद्वारे उत्पन्न मिळविणारे भूमिहीन कुटुंब.