शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

रुग्णसेवेतून साजरा केला मुलाचा वाढदिन

By admin | Updated: December 29, 2014 23:40 IST

किमान एक दिवस तरी त्यांचा भार मी थोडासा हलका करु शकलो याचे मला समाधान आहे

गुहागर : कोणताही डामडौल न करता गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्याने रुग्णालयातील रुग्णाचा एक दिवसाचा खर्च स्वत:च्या खिशातून करत आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला.लहान असो वा थोर, गरीब वा श्रीमंत आपल्या मुलांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. सुक्या, ओल्या पार्ट्या करुन आनंद साजरा केला जातो. नेते आणि पुढाऱ्यांच्या वाढदिवसांची तर तऱ्हाच निराळी! त्यांच्या वाढदिवसाचा त्यांच्यापेक्षा सर्वसामान्यांनाच मोठा भुर्दंड बसतो. आजच्या परिस्थितीत गुहागर ग्रामीण रुग्णालयातील लिपिकाने आपल्या छकुल्याचा वाढदिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला आणि इतरांनाही वेगळा विचार करावयास भाग पाडले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या जवळपास १२५पेक्षा जास्त रुग्णांचा भार या लिपिकाने पेलला. ग्रामीण रुग्णालयाचे लिपिक दीपक चव्हाण यांनी सोमवारी त्यांचा मुलगा प्रथमेश चव्हाण याचा वाढदिवस साजरा करताना ग्रामीण रुग्णालयात या दिवशी उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांचे शुल्क आपल्या स्वत:च्या खिशातून अदा केले. तालुक्यातील दुर्गम भागातून रुग्ण येथे येतात. चव्हाण यांच्या या कृतीतून बोध घेऊन आपल्यातील थोडथोडके नागरिक तरी अशा सत्कर्मासाठी पुढे आले तर मोठे समाजकार्य उभे राहील. चव्हाण यांच्या सत्कार्याबद्दल रुग्णालय अधीक्षक कांचन रेडीयार यांनी त्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)अनेकांची परिस्थिती हलाखीची असल्याचे आपण येथे काम करताना पाहिले आहे. मी त्यांच्यासाठी फार मोठे काही करु शकत नसलो तरी किमान एक दिवस तरी त्यांचा भार मी थोडासा हलका करु शकलो याचे मला समाधान आहे- दिपक चव्हाण, लिपिक.