शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कल्पनेच्या कुंचल्यात रंगली मुले

By admin | Updated: January 18, 2016 00:29 IST

भिमा फेस्टिव्हल : ‘रंग उमलत्या मनाचे’ चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : सकाळच्या बोचऱ्या थंडीत चित्र काढण्यासाठी लगबग, चिमुकल्यांची भिरभिरती नजर, लांबून पाहणारे पालक आणि बालकलाकारांच्या भावविश्वातील विविध आविष्कार कुंचल्यांच्या साहाय्याने चित्ररूपात कागदावर साकारले. निमित्त होते ‘भिमा फेस्टिव्हल’ अंतर्गत ‘रंग उमलत्या मनाचे’ चित्रकला स्पर्धेचे.हुतात्मा पार्क येथे रविवारी ‘चॅनेल बी’च्या वर्धापन दिनानिमित्त भिमा फेस्टिव्हल अंतर्गत ‘रंग उमलत्या मनाचे’ चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक व अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, सुहास लटोरे, रामराजे कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. चित्रकला स्पर्धेसाठी सकाळी साडेआठ वाजल्यापासून मुलांची लगबग सुरू झाली. पक्ष्यांचा किलबिलाट व मुलांच्या आवाजाने परिसरात वेगळाच उत्साह निर्माण झाला होता. चित्रे काढण्यासाठी मुले रंग-रेषांच्या दुनियेत हरवून गेली. ‘ए, मी छोटा भीम काढते, तू फुलांचे काढ वाटल्यास, नदीचे पाणी जरा रंगीत कर,’ असे एकमेकांना ती उत्साहाने सांगत होती. या स्पर्धेसाठी एकूण सात गट होते. यामध्ये सुमारे दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.याप्रसंगी अभिषेक जोशी, स्वप्निल दळवी, गौरव कार्इंगडे, अभिजित पडळकर या कलाकारांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार झाला. या कलाकारांनी साकारलेल्या कलाविष्काराचा अनुभव उपस्थितांना पाहायला मिळाला. स्पर्धेचे संयोजन सागर बगाडे, अनिल अहिरे, आदित्य शेटे यांनी केले होते. याप्रसंगी नगरसेवक सत्यजित कदम, नगरसेवक ईश्वर परमार, सुनील कदम, किरण शिराळे, शेखर कुसाळे, किरण नकाते, राजश्री शेळके, राजू दिंडोर्ले, संतोष गायकवाड, सुनंदा मोहिते, संग्राम निकम, माधुरी नकाते, मिलिंद धोंड, रियाज सुभेदार, शिवतेज शिवसृष्टी - वॉटर पार्कचे योगेश भारती, प्रशांत शेटे, उदयसिंह पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. सात गटांत स्पर्धा : पहिली व दुसरी, तिसरी व चौथी, पाचवी व सहावी, सातवी व आठवी, नववी व दहावी, अपंग, मतिमंद व गतिमंद असे गट होते. यामध्ये पहिली व दुसरी गटासाठी फ्लॉवरपॉट आणि कोणताही देखावा हे विषय होते. तिसरी आणि चौथीच्या गटासाठी वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान, पाचवी आणि सहावीच्या गटासाठी चित्रकला स्पर्धा आणि डोंबाऱ्याचा खेळ, सातवी आणि आठवीच्या गटासाठी अभयारण्य आणि प्रयोगशाळेतील दृश्य, तर नववी आणि दहावीसाठी - मंदिरातील एक प्रसंग आणि मूर्ती बनविणारे शिल्पकार असे विषय होते. मूकबधिर आणि गतिमंद गटासाठी समुद्रकिनारी खेळणारी मुले, सांस्कृतिक कार्यक्रम, माझं कोल्हापूर, छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एक प्रसंग; तर अपंग गटासाठी पाणी वाचवा आणि निसर्गचित्र असे विषय होते.