शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बाल विकास मंच सदस्य नोंदणी रविवारपासून

By admin | Updated: August 17, 2016 23:57 IST

बाल विकास मंचचे सदस्य होणाऱ्या बालचमूंना दोन लाख रुपयांचा लकी ड्रॉ मिळणार असून, एक हजार रुपयांचे सर्व्हिस कुपनही मिळणार आहे.

कोल्हापूर : बालचमूंची प्रतीक्षा संपली...! बालमनाचा सच्चा सवंगडी बनलेला ‘लोकमत बाल विकास मंच’ सन २०१६-१७ साठीच्या सदस्य नोंदणीस रविवार (दि. २१) पासून सुरुवात होत आहे. चिमुकल्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या, त्यांच्या भावविश्वात खास स्थान असणाऱ्या ‘लोकमत बाल विकास मंच’ची या वर्षीची सभासद नोंदणी कधी सुरू होणार, याची विचारणा गेल्या काही दिवसांपासून पालक व विद्यार्थ्यांमधून ‘लोकमत’ कार्यालयात होत होती; पण आता ती प्रतीक्षा संपली असून, रविवारपासून सदस्य नोंदणीला सुरुवात होत आहे. बाल विकास मंचचे सदस्य होणाऱ्या बालचमूंना दोन लाख रुपयांचा लकी ड्रॉ मिळणार असून, एक हजार रुपयांचे सर्व्हिस कुपनही मिळणार आहे. मुलांच्या कलागुणांच्या विकासासाठी तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे विविध उपक्रम, कार्यक्रम बाल विकास मंचतर्फे वर्षभर राबविण्यात येतात. बाल विकास मंच सदस्य नोंदणीकरिता कोणत्याही ओळखपत्र अथवा फोटोची गरज नाही. प्ले ग्रुप ते इयत्ता दहावीपर्यंतचे विद्यार्थी बाल विकास मंचचे सदस्य होऊ शकतात. सदस्य नोंदणी केल्यानंतर लगेचच २०३ रुपये किमतीची ‘माय कॅन बॉटल’ भेट म्हणून मिळणार आहे. तसेच ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क- फन फेअर व सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर या कार्यक्रमांचा पास मोफत मिळणार आहे. तर, चला तर मग...! बाल विकास मंचचे सदस्य व्हा. नोंदणी फी आहे फक्त १५० रुपये. अधिक माहिती व सदस्य नोंदणीसाठी ९५७९२३१५२० या मोबाईल क्रमांकावर अथवा कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथील लोकमत कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधा. सदस्य नोंदणी फॉर्म ‘लोकमत’ कार्यालयात उपलब्ध आहेत.