शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते विकास प्रकल्पाची तपासणी सुरू

By admin | Updated: July 16, 2014 01:01 IST

‘एमएसआरडीसी’चे पथक कोल्हापुरात : महिनाअखेरपर्यंत होणार काम पूर्ण

संतोष पाटील - कोल्हापूरएकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत शहरात आयआरबीने केलेल्या ४९.९९ किलोमीटर रस्त्याच्या तपासणीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. मंडळाच्या चार अभियंत्यांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले असून, ‘रोड लेव्हल व बिटल्स सर्व्हे’ (सर्वंकष सर्वेक्षण) द्वारे संपूर्ण प्रकल्पाची ‘कुंडली’ तयार केली जाणार आहे. पदपथ, रस्त्याची उंची (प्लिंथ लेव्हल), डांबरी व सिमेंटच्या रस्त्याची समानता, दोन्ही बाजूंची रूंदी, दर्जा, आदी तपासणी पुढील पंधरा दिवसांत केली जाणार आहे. आयआरबीने प्रकल्पाची अंदाजित किंमत ५०० कोटी रुपये असल्याचा दावा कंपनीने केल्यानेच राज्य शासनाने तपासणीचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.मंडळाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याचा दर्जा तपासण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक केली आहे. समितीने पंधरा दिवसांपूर्वीच शहराला भेट देऊन आढावा घेतला. समितीचे काम सुरू होण्यापूर्वीच मंडळाने स्वतंत्ररित्या रस्त्यांची तपासणी सुरू केली आहे. मंडळाने चार अभियंत्यासह चार पथके तैनात केली आहेत. शहराच्या विविध भागात फिरून प्रत्येक ठिकाणी रस्त्यांची पाहणी केली जात आहे. डांबरी व सिमेंट अशा पद्धतीने रस्ते केल्याने दोन्हींच्या मध्ये समानता नाही. यामुळे दुचाकीसह मोठ्या वाहनांचीही अडचण होते. शास्त्रीय पद्धतीने दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची तपासणी केली जाणार आहे. रस्त्याची उंची वाढविण्याची आवश्यकता होती का ? याची चाचपणी करून सिमेंटची तपासणी केली जाणार आहे. पथक दोन्ही बाजूंचे फुटपाथ व त्यांची पाणी जाण्याची क्षमता व दर्जा याचीही तपासणी करणार आहे. रस्त्याकडेच्या सर्व इमारतींची उंची तपासून रस्त्याच्या उंचीमुळे येणाऱ्या अडचणी अहवालात नमूद केल्या जाणार आहेत. जुलैअखेरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण होणार असून, याचा सविस्तर अहवाल मंडळाला सादर केला जाणार आहे. अहवालाचे पुढे काय होणार, याचे उत्तर मात्र मिळू शकले नाही.