शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘जलसंपदा’ अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By admin | Updated: April 3, 2015 01:02 IST

बिल मंजुरीसाठी आठ लाख : उपठेकेदाराकडून पोलीस ठाण्यात ‘व्हिडिओ क्लिप’ सादर

सातारा : पाणीपुरवठा योजनेचे काम देण्यासाठी आणि त्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्याकडून आठ लाख रुपये घेऊनही अंतिम बिल दिले नाही, अशी तक्रार उपठेकेदाराने शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी दिली. ‘जलसंपदा’चे दोन अधिकारी तसेच मुख्य ठेकेदाराविरुद्ध या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपठेकेदार दादासाहेब अण्णा वडर (चव्हाण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धोम पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता श्रीराम जाधव आणि उपअभियंता परशुराम कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कामाची पूर्ण रक्कम उपठेकेदाराला दिली नसल्याबद्दल दत्तसाई कन्स्ट्रक्शनचा राजू पवार याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, राजू पवार याच्या लायसेन्सवर केंजळ चाहूर(देशमुखनगर, ता. सातारा) येथील पाणीपुरवठा योजनेची ५० हजार लिटरची टाकी आणि मुख्य वाहिनी तसेच पोटवाहिन्या, पंपसेट आणि पंपहाऊस असे काम जाधव आणि कांबळे या अधिकाऱ्यांनी आपल्याला दिले होते. या कामाचे अंदाजपत्रक ३२ लाख ९८ हजार ९६६ रुपयांचे होते. हे काम आपण फेब्रुवारी २०१३ मध्ये सुरू केले. कामासाठी अ‍ॅडव्हान्स म्हणून धोम विभागाने २० लाख २७ हजारांची रक्कम मंजूर केली होती. त्यातून विविध करांची कपात करून राजू पवार (दत्तसाई कन्स्ट्रक्शन) याच्या खात्यावर १८ लाख ५० हजारांची रक्कम जमा झाली. एप्रिल २०१३ मध्ये राजू पवारने आपल्या मामाचा मुलगा सागर याच्या बँक खात्यावर १६ लाख ४४ हजार रुपये जमा केले आणि उरलेले दोन लाख सहा हजार नंतर देईन, असे तोंडी सांगितले. (फिर्यादीचे मामा रावसाहेब धोंडिराम चव्हाण यांनी अधिकाऱ्यांशी आपली ओळख करून दिली होती, असे फिर्यादीत नमूद आहे.) सागरने ही रक्कम आपल्याला रोख आणून दिली.त्यानंतर एप्रिलमध्ये धोम पाटबंधारेमधील श्रीराम जाधव आणि परशुराम कांबळे यांनी योजनेचे काम दिल्याबद्दल आणि बिल मंजूर केल्याबद्दल आठ लाख रुपयांची मागणी केली. रावसाहेब चव्हाण यांच्यासमक्ष आपण हे पैसे दोन टप्प्यांत श्रीराम जाधव यांच्या हातात दिले. पुरावा म्हणून आपण मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केले. नंतर ‘रनिंग बिल’ म्हणून अधिकाऱ्यांनी सहा लाख ६७ हजार रुपये मंजूर केले. करकपात करून राजू पवार याच्या खात्यावर पाच लाख ३९ हजार रुपये जमा केले. राजू पवारने सागर चव्हाणच्या माध्यमातून तीन लाख ५० हजार आपल्याला दिले व उरलेले एक लाख ८९ हजार नंतर देतो, असे सांगितले.२०१४ मध्ये योजनेचे काम आपण पूर्ण केले व अंतिम बिल म्हणून दोन लाख ७९९ रुपये मंजूर झाले. करकपात करून राजू पवारच्या खात्यावर एक लाख ८४ हजार रुपये जमा झाले. त्यातील एकही पैसा राजू पवारने आपणास दिला नाही. सुरक्षा अनामत म्हणून काम झाल्यावर मला दोन लाख रुपये मिळणार होते, तेही राजू पवारने दिले नाहीत. आॅक्टोबर २०१४ पासून उर्वरित सात लाख ७९ हजार रुपयांसाठी राजू पवारकडे आपण मागणी करीत असून, उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)मेमरी कार्ड मागविले...संबंधित व्यवहारांच्या ‘व्हिडिओ क्लिप’ एका वाहिनीवरून बुधवारी सायंकाळी प्रसारित झाल्या होत्या. ज्या मोबाईलवरून चित्रण करण्यात आले, त्याचे मेमरी कार्ड पोलिसांनी फिर्यादीकडून मागविले आहे. त्याची सत्यता तपासण्यासाठी कार्ड प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित व्यवहारांबाबत माहिती घेण्याच्या सूचना सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आल्या आहेत. ‘फिर्यादीला बोलावून माहिती घेऊन पुणे कार्यालयास पाठविली जाईल आणि त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येईल,’ असे निरीक्षक बयाजी कुरळे यांनी सांगितले.)