शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

छत्रपती संभाजीराजेंनी ‘वेळ’ साधली; पण...!

By admin | Updated: May 19, 2014 00:40 IST

राम मगदूम ल्ल गडहिंग्लज किल्ले सामानगडचे गडकरी आणि जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे यांची कोल्हापूर संस्थानचे वारसदार संभाजीराजे यांनी

 राम मगदूम ल्ल गडहिंग्लज किल्ले सामानगडचे गडकरी आणि जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे यांची कोल्हापूर संस्थानचे वारसदार संभाजीराजे यांनी लोकसभेचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर असताना भेट घेतली. छत्रपती व शिंदे घराण्याचे निकटचे संबंध असतानादेखील दोन वर्षांपूर्वी झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या विरोधातील प्रचाराबद्दल ‘दिलगिरी’ व्यक्त करण्याबरोबरच आपले स्नेही व रयत यांना ‘संदेश’ देऊन वेळ साधली. तरीदेखील धनंजय महाडिक यांचा ‘नेम’ चुकला नाही. हेच या निकालावरून स्पष्ट झाले. गडहिंग्लज नगरपालिकेची निवडणूक होऊन तब्बल दोन वर्षे उलटल्यानंतर ‘दिलगिरी’ व्यक्त करण्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीचा मोका साधला. त्यामुळे गडहिंग्लजच्या प्रचारात संभाजीराजे कसे? याची जिल्हाभर पुन्हा चर्चा झाली. छत्रपतींची शेकडो एकर शेतजमीन गडहिंग्लज व परिसरात आहे. गडहिंग्लजच्या शिवाजी बोर्डिंग व बसवेश्वर बोर्डिंगसह १०० खाटांच्या रुग्णालयासाठी संपादित करण्यात आलेली जमीनही त्यांचीच. गडहिंग्लजकरांशी त्यांचे ऋणानुबंध असल्यामुळेच मंत्री हसन मुश्रीफ व बाबा कुपेकर यांनी त्यांना पालिकेच्या प्रचारात उतरविले होेते. गडहिंग्लजमध्ये दहा दिवस तळ ठोकून त्यांनी शिंदे यांच्या ताब्यातील नगरपालिका राष्ट्रवादीला जिंकून दिली. गेल्यावेळी लोकसभेच्या कोल्हापूरच्या दोन्ही जागा गमावल्यामुळे थोरल्या पवारांचा अपमान झाल्यामुळे पराभवाची जखम बांधून व्यथित मनाने राबलेल्या मुश्रीफ यांच्याप्रमाणे संभाजीराजेंनीही गतवेळच्या स्वत:च्या पराभवाचे ‘शल्य’ बाजूला ठेवून कष्ट उपसले. संभाजीराजे यांनी जनता दलाच्या ताब्यातील पालिका काढून राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली. मात्र, या निवडणुकीत त्यांच्या नावाची साधी चर्चादेखील न झाल्यामुळेच त्यांनी यावेळी तटस्थपणाची भूमिका घेतली. मात्र, अवघ्या दोन दिवसांवर मतदान असतानाच त्यांनी ‘आपल्या’ गडकर्‍याजवळ मनमोकळं केलं आणि ‘गडहिंग्लज’मधील ‘रयतां’सह स्नेही मंडळींची भेट घेऊन खळबळ उडवून दिली होती.