शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

बदलती रचना गटबाजीच्या पथ्यावर

By admin | Updated: September 18, 2014 00:18 IST

मतविभागणीचा फायदा : पै-पाहुण्यांच्या राजकारणाला खो

राजाराम कांबळे - मलकापूर -स्वातंत्र्यापूर्वी शाहूवाडी तालुका कोल्हापूर व विशाळगड संस्थानांत विभागला होता. येथील ६८ गावांचा कारभार विशाळगड जहागिरीतून चालत होता. १९५० पासून शाहूवाडी तालुक्यात १३१ गावांचा समावेश झाला. १९५२ साली शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ साली मतदारसंघाची पुनर्रचना पन्हाळा-शाहूवाडी अशी झाली. पुनर्रचनेत शाहूवाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषदा व आठ पंचायत समिती मतदारसंघांचा समावेश होता; तर पन्हाळा तालुक्यातील चार जिल्हा परिषदा व आठ पंचायत समिती मतदारसंघांचा मिळून शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघ आकारास आला. जिल्ह्याच्या राजकारणात चाळीस वर्षे माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांनी अधिराज्य गाजविले. पक्षापेक्षा गटांच्या नेत्यांच्या शब्द प्रमाण मानणारा, गटातटाचे राजकारण केंद्रित असणारा शाहूवाडी तालुक्याचा इतिहास. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार विनय कोरे यांनी गटांच्या अस्तित्वाला सुरुंग लावला.१९५२ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे पहिले आमदार म्हणून भाई रंगराव पाटील-वडगावकर यांनी प्रतिनिधित्व केले; पाठोपाठ १९५७ ला त्र्यंबक कारखानीस हे निवडून आले. त्यामुळे शाहूवाडी तालुका शेकापचा बालेकिल्ला बनला. बालेकिल्ल्यास १९६२ मध्ये कॉँग्रेसचे उदयसिंहराव गायकवाड यांनी सुरुंग लावला. त्यांनी पाच वर्षे तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. मतदारसंघातील बांबवडे, मलकापूर, आंबा, करंजफेण या मोठ्या गावांत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा, तसेच पै-पाहुण्यांची मांदियाळी असल्याचा तसा फायदा गायकवाड यांनाच झाला. यावरच गायकवाड यांनी या मतदारसंघावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापने आंदोलने करत माजी आमदार राऊ पाटील-पेरीडकर यांनी गायकवाड यांचा पराभव केला. मात्र, खऱ्या अर्थाने तालुक्याचा भूगोल बदलला तो १९७२ नंतरच. उदयसिंहराव गायकवाड पुन्हा आमदार झाले. याचवेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या गटाचा उदय झाला. पाच वर्षांनी उदयसिंहराव गायकवाड खासदार झाल्याने पुढे धुरा सांभाळत बाबासाहेब पाटील आमदार झाले. येथूनच माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांनी आपल्या काकांचा हात धरून राजकारणात प्रवेश केला. बंडखोरी करून संजयसिंह गायकवाड यांनी शाहूवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांनाही पै-पाहुण्यांच्या मांदियाळीचा, तसेच उदयसिंहराव गायकवाड यांचा अंतर्गत हातमिळवणीचा फायदाच झाला. येथूनच सरूडकर गट, गायकवाड गट असे समीकरण तयार झाले. संजयसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड आमदार झाल्या. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ मध्ये झाली. २००४ मध्ये आमदार सत्यजित पाटील यांनी निवडून येऊन त्यांनी शिवसेनेचा झेंडा उभारला. त्यावेळी मानसिंगराव गायकवाड व करणसिंह गायकवाड अशी दोन गटांत फूट पडली. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघ २००९ मध्ये निर्माण झाला. या नव्या आकाराला आलेल्या मतदारसंघावर तसे विनय कोरे यांनीच प्राबल्य दाखविले. नव्या मतदारसंघात पन्हाळा तालुक्यातील ४ जिल्हा परिषद, ८ पंचायत समित्यांचा समावेश झाला. त्यामुळे या पन्हाळा तालुक्यातील मोठ-मोठ्या गावांमुळे शाहूवाडी तालुक्यातील जुन्या मतदारसंघातील दुर्गम, लहान वाड्या-वस्त्या खुज्या ठरल्या. त्यातच दोन्ही तालुके जोडल्यानंतर पूर्ण पन्हाळा तालुक्यातून एकटे विनय कोरे अन् शाहूवाडी तालुक्यातून मानसिंग आणि करणसिंह गायकवाडसह सत्यजित पाटील, आदी उमेदवारांमुळे मतांची विभागणी झाली. त्याचा फायदा कोरे यांनीच उठवून या नव्या आकारास आलेल्या मतदारसंघावर आजअखेर प्राबल्य ठेवण्यात यश मिळविले.