शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादा महाडिकांच्या बंगल्यावर; ‘भाजता’वर चर्चा !

By admin | Updated: January 15, 2017 01:13 IST

जिल्हा परिषदेचे राजकारण : ही तर तीळगूळ भेट - महादेवराव महाडिक

कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळात दोन नंबरचे स्थान असलेले महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील शनिवारी चक्क माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या पुलाची शिरोली येथील बंगल्यावर गेल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या राजकीय हालचाली तिथे झाल्या. महाडिक यांनी ही तीळगूळ भेट होती, असे सांगितले असले तरी शिवसेनेला वगळूनच भाजप, ताराराणी आघाडी आणि जनसुराज्य (भाजता) यांची एकत्रित आघाडी करून जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी तिथे व्यूहरचना निश्चित झाली असल्याचे समजते. सकाळी साडेनऊ वाजता सुमारे अर्धा तास ही भेट झाली. यावेळी आमदार अमल महाडिक, स्वरूप महाडिक हे देखील उपस्थित होते. ‘गोकुळ’चे संचालक रणजित पाटील यांचा भाजप प्रवेश अजून झालेला नाही. रणजित पाटील हे महाडिक यांचे कट्टर समर्थक मानले जातात. तोही पदर या भेटीमागे होता, असे समजते. यापूर्वी गोकुळ अष्टमीला दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात ६ सप्टेंबर २०१५ ला माजी आमदार महाडिक यांनी पालकमंत्री पाटील यांना खाली वाकून नमस्कार केला होता. त्यावेळी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी तोंडावर होती. त्यामुळे महाडिक यांच्या या नमस्कारावरून बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. पालकमंत्री पाटील यांची राजकीय ताकद इतकी आहे की, ते कुणालाही बोलावून घेऊ शकतात; परंतु तेच थेट महाडिक यांच्या बंगल्यावर गेल्याने पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली.महापालिका असो की नगरपालिका ‘भाजप’ला तसे निर्विवाद यश मिळालेले नाही. त्यात ग्रामीण राजकारणात ‘भाजप’ची ताकद तशी मर्यादित आहे. आणि जिल्हा परिषदेच्या सत्तेचा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होतो. त्यामुळे ही सत्ता ताब्यात घेण्यासाठी दादांनी कंबर कसली आहे. त्यासाठीच दोन्ही काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील हाताला लागेल त्या कार्यकर्त्यास ते ‘भाजप’मध्ये घेत आहेत. त्याच रणनीतीचा भाग म्हणून पालकमंत्री पाटील-महाडिक यांची भेट झाली. महाडिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे; परंतु त्यांचा मुलगा आमदार अमल हा मात्र ‘भाजप’चाच आहे. व दुसरा मुलगा स्वरूप हा ताराराणी आघाडीचा प्रमुख असून, ही आघाडी ‘भाजप’चा मित्रपक्ष आहे.दादांचा संपर्क नाहीदरम्यान, याबाबत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.राजकारणात मीच ‘वजीर’४दरम्यान, या भेटीनंतर महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाडिक योग्यवेळी रणांगणात उतरणार आहे. ४त्यापासून बाजूला राहणार नाही. महाडिक गटाची ताकद काय आहे, हे त्यावेळी लोकांना समजलेच. बुद्धिबळाच्या खेळातील मीच ‘वजीर’ असून, हत्ती-घोडे यांच्यावर कशी चाल करायची, हे या महाडिकास नवीन नाही.’मकर संक्रांती हा वर्षातील पहिला सण म्हणून शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री पाटील हे माझ्या घरी आले होते. त्यामध्ये अन्य कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. - महादेवराव महाडिक, माजी आमदार.