शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

अवजड वाहतूक रोखण्याचे आव्हान

By admin | Updated: December 31, 2015 00:21 IST

जुजबी कारवाई : वाळू वाहतुकीमुळे बंधारा कमकुवत

संदीप बावचे == शिरोळ -महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. बॅक वॉटरबरोबर सीमाभागातील गावात दळणवळणासाठी सोयिस्कर ठरावा यासाठी बंधारा उभारण्यात आला. अवजड वाहतुकीला बंदी असतानाही राजरोसपणे ही वाहतूक सुरू असते. सामाजिक संघटनांनी आंदोलने करूनही केवळ पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळेच बंधाऱ्याला अवकळा आली आहे. स्व. आ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या अथक प्रयत्नांतून ज्या उद्देशाने राजापूर बंधाऱ्याची उभारणी झाली त्याची पायमल्लीच मोठ्या प्रमाणात झाली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेला हा बंधारा दळणवळणाच्या दृष्टिकोनातून या परिसरातील गावांना फायदेशीर ठरला. बंधाऱ्यावरून अवजड वाहतुकीला बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात वाळू वाहतुकीबरोबर माती, दगड, विटा याचीही वाहतूक होत असल्यामुळे बंधारा कमकुवत होण्यात भर पडली आहे. बंधाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या सुरक्षा कमानीही वाळू तस्करी करणाऱ्यांनी उखडून टाकल्या असल्याचे येथील नागरिकांतून सांगण्यात येते. दोन राज्यांतील सीमाभागाचा फायदा घेत, दरवर्षी वाळू तस्कर बंधाऱ्यानजीकच यांत्रिकी बोटी टाकून बेसुमार वाळू उपसा करतात. सीमेचा प्रश्न दाखवीत शिरोळ महसूल विभागाकडून जुजबी कारवाई केली जाते. ठोस कारवाई होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राजापूर बंधारा असला तरी सांगली पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित तो असल्यामुळे हा बंधारा ‘ना घरका, ना घाटका’ बनला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या बेफिकीरपणामुळेच वाळू उपसा असो अथवा अवजड वाहतूक याला कोणतेच बंधन राहिले नाही. रखवालदार नसल्यामुळे ‘आओ-जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था बंधाऱ्याची आहे. या ठिकाणी बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. सुमारे ३५ वर्षे पूर्ण झालेल्या बंधाऱ्याची दयनीय अवस्था झाली आहे. योग्य देखभाल, दुरुस्ती वेळोवेळी झाली असती तर बंधाऱ्याची ही अवस्था झाली नसती, अशी येथील नागरिकांची प्रतिक्रिया आहे. पाटबंधारे विभागाबरोबरच लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत. (समाप्त)खासदार, आमदारांच्या भूमिकेकडे लक्षशेतकरी चळवळीतून खासदार व आमदार पदावर पोहोचलेले खा. राजू शेट्टी, आ. उल्हास पाटील बंधाऱ्याच्या या प्रश्नाबाबत लक्ष घालतील. राजापूर बंधाऱ्याचे महत्त्व दोघांनाही माहीत असल्यामुळे निश्चित पाठपुरावा करून बंधाऱ्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करतील, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.दूरदृष्टीतून निर्मितीपाऊस कमी, आणि महापुराची हमी असलेल्या शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांची तहान भागविण्याबरोबर शेतीलाही पाणी मिळावा या उद्देशाने दूरदृष्टी ठेवून बंधारा बांधण्यात आला. गेली ३५ वर्षे बॅक वॉटरच्या पाण्यामुळे २२ हून अधिक गावांना पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीलाही पाणी मिळत आहे. यामुळे वेळीच लक्ष घालून बंधारा वाचविण्याची गरज आहे.