शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

२८ कोटींच्या ‘एलईडी’त ‘उजेड’ पाडण्याची धडपड

By admin | Updated: December 11, 2014 00:32 IST

सल्लागाराचा ‘खो’ : डिसेंबरअखेर मंजुरीची घाई

कोल्हापूर : विजेची ५० टक्के व खर्चातही मोठी बचत करणारे अत्याधुनिक २३ हजार एलईडी बल्ब संपूर्ण शहरभर बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. २८ कोटींच्या या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च ठेकेदार करणार आहे. सध्याच्या ५८ लाख रुपये वीज बिलातून तब्बल २५ लाख रुपयांच्या होणाऱ्या बचतीचे पैसे ठेकेदारास देऊन त्याबदली प्रकल्पाचे पैसे भागविले जाणार आहेत. मात्र, या प्रकल्पाला ‘खो’ घालण्यासाठी दबावतंत्राचा वापर करीत सल्लागार नेमण्याची टूम काढल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.‘लक्स’ तंत्रज्ञानावर आधारित हे बल्ब तब्बल दहावर्षे म्हणजेच जवळपास ५२ हजार तास चालणार आहेत. प्रकल्पकाळात पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचा खर्च ठेकेदारच करणार आहे. या प्रकल्पासाठी महानगरपालिकेला एक रुपयाचीही गुंतवणूक करावी लागणार नाही. त्यामुळे नजीकच्या सहा महिन्यांत अवघे शहर पांढऱ्याशुभ्र प्रकाशाने न्हाऊन निघण्याची शक्यता आहे. प्रकल्पाची जाहीर निविदा २९ डिसेंबरला खुली करून ३० डिसेंबरला ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. स्थायी सभापतींची मुदत ३१ डिसेंबरला संपण्यापूर्वी ‘स्थायी’ची बैठक बोलावून निविदेला अंतिम स्वरूप देण्याची लगबग सुरू आहे. मात्र, पुढील दहा महिन्यांसाठी स्थायी समिती सभापतिपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. त्यामुळे २८ कोटींचा ‘उजेड’ आपल्या कारकिर्दीतच पडावा, यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. प्रकल्प लांबणीवर पडावा, यासाठीच सल्लागार कंपनीसह निविदेतील अटी, शर्ती बदलण्याचा घाट घातला जात असल्याची नगरसेवकांत चर्चा आहे. (प्रतिनिधी)महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता अशा प्रकल्पासाठी पैसे उपलब्ध होणे अशक्य आहे. अशा पद्धतीचे प्रकल्प नाशिक, लातूर, पुणे शहरांत सुरू आहेत. मुदत संपल्यानंतर महापालिकेला महिन्याकाठी त्यावेळच्या विजेच्या दराप्रमाणे किमान ५० लाखांची मासिक बचत होईल. सर्वांशी चर्चा करून अटी व शर्तींमध्ये बदल केला जाणार आहे. महापालिकेला दरमहा दहा टक्के विजेच्या बचतीतील हिस्सा देण्याचाही प्रस्ताव आहे. अशा प्रक ल्पामुळे विजेसारख्या राष्ट्रीय संपत्तीची यामुळे बचत होईल. - सचिन चव्हाण (स्थायी समिती सभापती)