शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
2
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
3
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
4
पंक्चर दुकानाचा मालक आणि व्यवसायाने ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
5
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
6
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
7
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
8
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला सरकारचे सहकार्य: देवेंद्र फडणवीस
9
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
10
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या
11
Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
12
मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न
13
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांना मोठा धक्का; कोर्टाने लीक फोन कॉल प्रकरणात ठरवलं दोषी
14
पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर
15
'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली
16
लग्न, घटस्फोट अन् आता पुन्हा साखरपुडा... २ वर्षात दोनदा 'प्रेमात'; दुबईची राजकुमारी चर्चेत
17
त्याने BMW थांबवली, मला म्हणाला गाडीत बस अन्...; नम्रता संभेरावने सांगितला बॉलिवूड अभिनेत्याचा 'तो' किस्सा
18
Pakistan Flood : पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार
19
Jio IPO: जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
20
Samsung Galaxy A17: २० हजारांत जबरदस्त फीचर्स; सॅमसंगच्या 5G फोनची बाजारात एन्ट्री!

नव्या कुलगुरूंसमोर संशोधनवाढीचे आव्हान

By admin | Updated: June 18, 2015 01:20 IST

गतिमान कामकाजाची अपेक्षा : महाविद्यालये, कॅम्पस् डेव्हलपमेंटला बळ द्यावे; गुणवत्ता टिकविण्याचीही गरज

संतोष मिठारी - कोल्हापूर -संशोधन, नावीन्याचा ध्यास आणि सकारात्मक विचारप्रवृती असलेल्या नूतन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता टिकविण्यासह संशोधनवाढीचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यासह संलग्नीत महाविद्यालये आणि विद्यापीठ परिसरातील विकासाला (कॅम्पस् डेव्हलपमेंट) बळ देण्याचे काम त्यांना तातडीने करावे लागणार आहे. शिवाजी विद्यापीठातील घटकांना डॉ. शिंदे यांच्याकडून विद्यार्थी केंद्रित आणि गतिमान प्रशासकीय कामकाजाची अपेक्षा राहणार आहे.शिवाजी विद्यापीठाने यापूर्वी विद्यार्थी केंद्रित व नावीन्यपूर्ण उपक्रम, संशोधन कार्य, आदी विभागांतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून (नॅक) ‘अ’ (ए) मानांकन मिळविले आहे. त्याद्वारे पुणे, मुंबईकडून गुणवत्तेचा केंद्रबिंदू प्रयत्नपूर्वक दक्षिण महाराष्ट्राकडे सरकविला आहे. हे मानांकन टिकविण्याचे आव्हान नूतन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना पेलावे लागणार आहे. महाविद्यालयीन पातळीवरील संशोधन क्षेत्राकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यापीठ कॅम्पस्मधील विविध विभागांत संशोधनाचे काम सुरू आहे. मात्र, पेटंट मिळविण्याचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासह या संशोधनाला व्यावसायिकतेची जोड देण्याचे काम त्यांच्याकडून होणे गरजेचे आहे. कॉमन फॅसिलिटी, कन्व्हेनशियल आणि इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून कॅम्पस डेव्हलपमेंट होणे आवश्यक आहे. प्र-कुलगुरू, कुलसचिव, बीसीयुडी संचालक या पदांवर सकारात्मक विचार प्रवृत्तीच्या व्यक्तींना संधी देत त्यांना प्रशासन गतिमान करावे लागणार आहे. डॉ. शिंदे यांच्या कुलगुरू पदावरील निवडीमुळे मराठवाड्याच्या गुणवत्तेला चकाकी मिळाल्याची भावना येथील शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त झाली. ही चकाकी कायम राखण्यासह स्थापनेची पन्नाशी ओलांडलेल्या आणि ‘अ’ मानांकन मिळविलेल्या शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता टिकविण्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक वाढविण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. ‘रुसा’चा पाठपुरावाकेंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार विद्यापीठाने तीन वर्षांसाठीचा सुमारे १५७.३७ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. यातून विद्यापीठातील पायाभूत सुविधा विकास, संशोधन, नवनिर्मिती व दर्जा सुधार, आदींबाबत कामकाज केले जाणार आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा नेटाने होणे अपेक्षित आहे.विद्यापीठ घटकांच्या अपेक्षाप्राचार्य या घटकाची विद्यापीठाबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका असून, ती यापुढेही कायम राहील. ‘रुसा’ योजनेच्या प्रस्तावाचा पाठपुरावा नव्या कुलगुरूंकडून व्हावा. महाविद्यालये सुरू झाली तरी अजून काही परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे परीक्षा विभागाचे काम सुरळीत आणि भक्कम करावे. महाविद्यालयांतील संशोधनासाठी बळ द्यावे.- डॉ. क्रांतिकुमार पाटील, अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनचिटणीस, विद्यापीठ सेवक संघविद्यार्थ्यांशी संबंधित निर्णयामध्ये या घटकाचा विचार घेतला जात नाही. आधुनिकतेच्या नावाखाली परीक्षा विभाग विश्वासार्हता हरवत चालला आहे. संशोधनाच्या सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे इनोव्हेशन थांबले आहे. रोजगाराभिमुख शिक्षण देण्यात विद्यापीठ कमी पडत आहे. एकूणच विद्यार्थीभिमुखता विद्यापीठ विसरले की काय? अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे नव्या कुलगुरूंची विद्यार्थी केंद्रित भूमिका असावी. - अमित वैद्य, जिल्हाप्रमुख, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदविद्यापीठातील सर्व घटकांना सोबत घेऊन विद्यार्थी केंद्रबिंदू मानून नूतन कुलगुरूंनी काम करावे. विद्यापीठ कायद्यानुसार कामकाज व्हावे. बेकायदेशीर गोष्टींना त्यांनी पायबंद घालावा.- प्रा. रघुनाथ ढमकले, जिल्हाध्यक्ष, विद्यापीठ शिक्षक संघविद्यापीठातील सर्व घटकांना सोबत घेऊन विद्यार्थी केंद्रबिंदू मानून नूतन कुलगुरूंनी काम करावे. विद्यापीठ कायद्यानुसार कामकाज व्हावे. बेकायदेशीर गोष्टींना त्यांनी पायबंद घालावा. - प्रा. रघुनाथ ढमकले, जिल्हाध्यक्ष, विद्यापीठ शिक्षक संघ