शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

सभापती, नगरसेवकांत धक्काबुक्की

By admin | Updated: June 16, 2015 01:14 IST

इचलकरंजी नगरपालिकेतील प्रकार : दोघांच्या समर्थकांमध्ये झालेल्या रेटारेटीत काच फुटली

इचलकरंजी : नगरपालिकेचे बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे व नगरसेवक मोहन कुंभार यांच्यात मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्येच शिवीगाळ व धक्काबुक्की झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून परस्परांना रेटारेटी केल्यामुळे दालनातील पार्टीशनची काच फुटली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नगरसेवक व पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. नगरसेवक संतोष शेळके यांनी पालिकेवर काढलेल्या मोर्चावेळी झालेल्या चर्चेमध्येच हा प्रकार घडला.प्रभागातील रस्ते आणि अस्वच्छता यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवक शेळके, तमन्ना कोटगी व रवी लोहार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नगरपालिकेवर मोर्चा काढला होता. याबाबत मुख्याधिकारी सुनील पवार यांच्यासमोर प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नसल्यामुळे नगरसेवक शेळके यांनी जोरदार संताप व्यक्त केला. तेव्हा साडेपाच कोटी रुपयांची मंजूर असलेली गटारींची कामे का होत नाहीत, असा प्रश्न नगरसेवक शेळके यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्याधिकारी पवार यांनी सांगितले, या कामांबाबत तक्रारी झाल्या. मात्र, आता ही कामे मार्गी लागली असून, मक्तेदारांना वर्क आॅर्डर देण्याचे काम सुरू आहे, अशी चर्चा सुरू असतानाच नगरसेवक मोहन कुंभार तेथे आले. त्यांनी कुडचे मळा व बाळनगर परिसरातील गटारींची कामे मंजुरीसाठी का घेतली नाहीत, अशी विचारणा मुख्याधिकाऱ्यांना केली. तेव्हा गटार बांधकामाबाबत कुणी तक्रार केली, अशी विचारणा आंदोलनकर्त्या नागरिकांतून करण्यात आली. यावर मुख्याधिकारी पवार खुलासा देताना म्हणाले, नगरसेवक विठ्ठल चोपडे, माजी नगरसेवक दीपक ढेरे व त्यानंतर मोहन कुंभार यांनी तक्रारी केल्या आहेत. मुख्याधिकारी यांनी नावे सांगताच बांधकाम सभापती आवळे यांनी चर्चेमध्ये हस्तक्षेप केला. आणि आवळे व कुंभार यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दोघांमधील आरोप-प्रत्यारोप वाढत गेले. तेव्हा तेथे असलेल्या काहीजणांनी कुंभार यांना मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. असा गोंधळ सुरू असताना कुंभार यांच्याबरोबर आलेल्या एका समर्थकाने ‘सगळे चोर आहेत’, असे विधान केले. त्यामुळे संतप्त झालेल्या आवळे यांनी, ‘कुणाला चोर म्हणता?’, असा जाब विचारत ते कुंभार यांच्या अंगावर गेले. आणि दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली.मुख्याधिकाऱ्यांच्या दालनालगत असलेल्या अ‍ॅन्टी चेंबरर्सचे पार्टीशन जोरजोराने हलू लागले आणि पार्टीशनची काच फुटली. ही काच लिपीक गणेश शिंदे यांच्या अंगावर पडली; पण सुदैवाने फक्त शर्ट फाटला, जखम झाली नाही. हा प्रकार सुरू असतानाच नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यासुद्धा तेथे उपस्थित होत्या. उपस्थित नगरसेवक महादेव गौड, मदन झोरे, सयाजी चव्हाण, आदींसह पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा वाद मिटविला. (प्रतिनिधी)स्वच्छतेचे आश्वासनमुख्याधिकाऱ्यांच्या दालनामधील चर्चेवेळी प्रभाग क्रमांक तेरामध्ये साचलेला कचरा व तेथील अस्वच्छता यांची पाहणी मुख्याधिकारी पवार हे मंगळवारी प्रत्यक्ष करणार असल्याचे सांगण्यात आले. या पाहणीनंतर तेथील नियमितपणे होणारी सफाई व स्वच्छतेचे नियोजन केले जाणार आहे, अशीही ग्वाही यावेळी देण्यात आली.