शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने साखर निर्यात धोरण खुले ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST

विश्वास साखर कारखान्यात रोलर पूजन सरूड : अडचणीत आलेला देशातील साखर व्यवसाय टिकवायचा असेल तर केंद्र सरकारने साखर निर्यात ...

विश्वास साखर कारखान्यात रोलर पूजन

सरूड : अडचणीत आलेला देशातील साखर व्यवसाय टिकवायचा असेल तर केंद्र सरकारने साखर निर्यात धोरण खुले ठेवून निर्यात साखरेचे अनुदानही कायम ठेवावे. साखरेची किमान किंमत ३ हजार ५०० रुपये करावी, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक केले.

चिखली येथील विश्वासराव नाईकसह साखर कारखान्यात रोलर पूजन व ८ मे. वॅट क्षमतेचे टर्बाईन बसवणे कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालक विश्वास कदम यांच्या हस्ते रोलर पूजन झाले तर युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते ८ मे. वॅट क्षमतेचे टर्बाईन बसविणे कामाचे भूमिपूजन झाले.

आ. नाईक पुढे म्हणाले, सन २०२०-२१ कोरोना संसर्ग असतानाही कारखान्याने उत्कृष्ट कामगिरी करत गळीत हंगाम यशस्वी केला. यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी मोठे सहकार्य केले. या हंगामातील गाळप उसाला आतापर्यंत पाहिले व दुसऱ्या बिलाच्या माध्यमातून २ हजार ७५० रुपये अदा केले आहेत. अंतिम बिल दीपावलीस देऊन दीपावली गोड करणार आहे.

यावेळी जि. प. चे बांधकाम व आरोग्य सामितीचे सभापती हंबीरराव पाटील, राजेंद्रसिंह नाईक, संचालक सर्वश्री. विजयराव नलवडे, दत्तात्रय राणे, शामराव मोहिते, यशवंत दळवी, यांच्यासह सर्व संचालक, खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद, कर्मचारी आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : '

चिखली येथे विश्वास कारखान्यात रोलर पूजन व ८ मे. वॅट क्षमतेचे टर्बाईन बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन करताना प्रसंगी अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर , राजेंद्रसिंह नाईक, युवा नेते विराज नाईक व संचालक मंडळ आदी.