शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

शहराशेजारचे निर्जन माळ गुन्हेगारी कारवाईची केंद्रे

By admin | Updated: May 18, 2015 01:20 IST

पोलीस गस्तीची गरज : कात्यायनी, गिरगाव, पाचगावचे माळ लक्ष्य

एकनाथ पाटील / कोल्हापूर डोंगर-दऱ्या, खुरटी झुडपे आणि स्मशान शांतता असलेल्या शहराशेजारील कात्यायनी, पाचगाव व गिरगाव परिसरातील माळ खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुन्हेगारांना सुरक्षित ठिकाण बनली आहेत. एक महिन्यापूर्वी कात्यायनी परिसरात एका युवतीचा खून करण्यात आला होता. त्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती अद्याप लागलेले नाहीत. तोपर्यंत लहू ढेकणे याचा शिर व हातांचे पंजे धडावेगळे करून मृतदेह पाचगाव-गिरगाव येथील डोंगरात टाकण्यात आला. या घटनांमुळे या परिसरात, शिवारात शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. करवीर व गोकुळ शिरगाव या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या वादामुळे या परिसरात पोलिसांची गस्त नाही. याचाच फायदा घेत गुन्हेगारांनी या निर्जन परिसराला लक्ष केले आहे. कात्यायनी, पाचगाव व गिरगाव गावातील या माळरानाच्या सीमा एकमेकांस लागून आहेत. डोंगराळ भाग असलेल्या या परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर असल्याने कोणी एकटे-दुकटे जाण्याचे धाडस करीत नाही. दिवसा या मार्गावरून तुरळक रहदारी असते. रात्री सातनंतर या मार्गावर स्मशान शांतता असते. निर्जन, निसर्गसौंदर्याचा व धार्मिक परिसर म्हणून कात्यायनी परिसराची ओळख वाढू लागल्याने या परिसरात प्रेमीयुगुलांचा वावर वाढू लागला. निर्जनस्थळी आलेल्या प्रेमीयुगलांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे हा परिसर गुन्हेगारांचा अड्डाच बनला आहे. या निर्जन परिसराचा अनेकजण गैरमार्गांसाठी वापर करीत आहेत. दि. १९ एप्रिलला कात्यायनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या चरीत २५ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह टाकण्यात आला होता. तिचा चेहरा ओळखू नये यासाठी चेहऱ्यावर सत्तर किलोंचा दगड ठेवण्यात आला होता. अशा घटनांनी या परिसरात गवत कापणे, गुरे चारण्यासाठी जाणारे गुराखी व शेतकरी या घटनांमुळे चक्रावून गेले आहेत. कणेरीवाडी येथील पाझर तलावात दि. ६ एप्रिल रोजी चाळीस वर्षांच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह खून करून पोत्यात बांधून टाकलेला गोकुळ शिरगाव पोलिसांना मिळून आला होता. या खुनाचे कोणतेही धागेदोरे अद्याप पोलिसांना मिळालेले नाहीत. हादेखील परिसर निर्जन आहे.