शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानातील तांदळात सिमेंटचे तुकडे

By admin | Updated: November 25, 2014 00:30 IST

राजगोळीतील घटना : लाभार्थ्यांचा दुकानसमोर ठिय्या : तलाठ्याकडून पंचनामा

कोवाड : येथून जवळच असलेल्या राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील भरमलिंग सेवा संस्थेच्या स्वस्त धान्य रेशन वाटप दुकानातील तांदळाच्या पोत्यातून मोठ्या प्रमाणात सिमेंटचे तुकडे व बुरशी आलेले गहू सापडल्याने प्रचंड गोंधळ उडाला; पण असे खराब धान्य घेण्यासाठी दुकानदार लाभार्थ्यांवर जबरदस्ती करू लागल्याने वैतागलेल्या धान्य लाभार्थ्यांनी दुकानासमोरच ठिय्या मांडून आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा देऊन धान्य वाटप तत्काळ बंद पाडले, तर पुरवठा विभागाकडे तक्रार करून तलाठी संतोष पाटील यांना पंचनामा करायला भाग पाडले.येथील स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये नेहमीप्रमाणे आज, सोमवारी सकाळपासून धान्य वाटप चालू होते; पण दुपारी दोन ते तीनच्या सुमारास तांदळाच्या पोत्यामधून मोठ्या प्रमाणात सिमेंटचे तुकडे आढळून आले. त्यामुळे असे सिमेंटमिश्रित धान्य घेण्यास महिलांनी नकार दिला; पण दुकानदाराने याची दखल न घेताच धान्य हवे तर घ्या, नाही तर निघून जा, अशी धकमी दिली. त्यामुळे उपस्थित महिला संतप्त झाल्या. याची चर्चा गावात होताच आणखी महिलावर्ग दुकानासमोर जमा झाला. तरीही दुकानदार अरेरावी करीत असल्याने महिलांनी धान्य घेण्यास नकार देऊन दुकानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. ही बातमी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सुरेश पाटील, कोवाड शहरप्रमुख अशोक मनवाडकर यांना समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन तांदूळ पोत्यांची तपासणी केली. यावेळी गव्हाच्या पोत्यांची तपासणी केली असता गहू ही बुरशी आलेले होते. या संदर्भात दुकानदाराला जाब विचारला असता, पुरवठा विभागाकडूनच अशाप्रकारचे धान्य वितरित केले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घालून तांदूळ व गव्हाच्या पंचनाम्याची मागणी केली. शेवटी तलाठी संतोष पाटील यांनी घटनास्थळी येऊन धान्य पोत्यांचा पंचनामा केला. (वार्ताहर)शिवसेना व लाभार्थ्यांनी केलेल्या तक्रारीवरून राजगोळी बुद्रुक येथील रेशन धान्य दुकानातील तांदूळ व गहू पोत्यांचा पंचनामा करण्यात आला. या संदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार डी. एम. नांगरे यांनी दिली.रेशन धान्य दुकानांना वारंवार अशा प्रकारचा खराब तांदूळ व गव्हाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे लाभार्थ्यांना नाईलाजास्तव हे धान्य खरेदी करावे लागते.