शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:16 IST

कोल्हापूर : येथील शिवाजी स्टेडियममधील शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात २२ वा वर्धापन दिन साधेपणाने पण उत्साहात साजरा करण्यात ...

कोल्हापूर : येथील शिवाजी स्टेडियममधील शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात २२ वा वर्धापन दिन साधेपणाने पण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे विविध सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून फक्त ध्वजारोहण करण्यात आले. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते सकाळी १० वाजून १० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पोवार म्हणाले, गेली १७ वर्षे मी कोल्हापूर शहरात पक्षाचे प्रतिनिधित्व करीत आहे. शहरात राष्ट्रवादी रुजवण्याचे काम प्रामाणिकपणे केले. आज मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण इतर आरक्षण आहे तसेच ठेवून मराठा आरक्षण मिळावे, अशी आमची भूमिका आहे.

यावेळी शहराध्यक्ष पोवार यांच्या हस्ते केक कापण्याचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले. कार्यक्रमास सुनील पाटील, महेंद्र चव्हाण, जहिदा मुजावर, रमेश पोवार, प्रसाद उगवे, लालासोा जगताप, निरंजन कदम, रामराजे बदाले, रियाज कागदी, निशिकांत सरनाईक, महादेव पाटील, सुनील जाधव, नितीन पाटील, सलीम मुल्ला, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, सोहेल बागवान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुहास साळोखे यांनी आभार मानले.

दरम्यान, येथील मार्केट यार्डातील ग्रामीण राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी ठीक दहा वाजून १० मिनिटांनी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून केक कापण्यात आला. जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्षा स्वाती मोरे यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते जीवन संजीवनी बुटी या कोरोना जीवरक्षक औषधाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटप करण्यात आले. आरोग्य दिंडी सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. गोकूळचे संचालकपदी निवड झाल्याबद्दल किसनराव चौगुले, शिरोळ नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमरसिंह माने-पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निहाल कलावंत यांची शाल, श्रीफळ मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

यावेळी बाळासाहेब देशमुख, यासीन मुजावर, हरिश्चंद्र पाटील, बाळासाहेब खैरे, रोहित पाटील, ए. व्ही. आरळेकर, अनिरुद्ध गाडवी, संतोष मेंगाणे, रामराव इंगळे, मधुकर जांभळे, शिवानंद माळी, संभाजी पवार, श्वेता बडोदेकर, स्नेहल मठपती, अस्मिता पवार, स्वाती मोरे आदी उपस्थित होते.

फोटो: १००६२०२१-कोल- राष्ट्रवादी०१

कोल्हापुरातील मार्केट यार्डातील ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात केक कापून वर्धापन दिन साजरा करताना जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, किसनराव चौगुले, अमरसिंह माने-पाटील आदी उपस्थित होते.

फोटो: १००६२०२१-कोल- राष्ट्रवादी

कोल्हापुरातील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सुनील पाटील, फिरोज सौदागर, सुनील देसाई, महेंद्र चव्हाण, जहिदा मुजावर, प्रसाद उगवे, निरंजन कदम, सुहास साळोखे आदी उपस्थित होते.

------