शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात सीसीटीव्हींचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:48 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने कडक पावले उचलली असून, यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचे सहकार्य ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने कडक पावले उचलली असून, यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचे सहकार्य घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील महत्त्वाच्या ६० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, ३०० हून अधिक वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे.आदर्श आचारसंहितेमधील अनेक बाबी प्रशासनाने गांभीर्याने घेत प्रक्रिया सुरू केली असून, यामुळे अनेक अनैतिक पद्धतींना पायबंद बसणार आहे. यातील पहिला भाग म्हणजे जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात प्रवेश करणारी ६0 महत्त्वाची ठिकाणे प्रशासनाने निश्चित केली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये अशा पद्धतीची महत्त्वाची ठिकाणे ठरविली असून, येथे वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे; त्यामुळे रोख पैसे, शस्त्रात्रे वा आक्षेपार्ह वस्तू नेण्यावर निर्बंध येणार आहेत.मतमोजणी केंद्रावरही सीसीटीव्हींची नजर राहणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी सात याप्रमाणे १२ मतदारसंघांसाठी ८४ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. ईव्हीएमची वाहतूक करण्यापासून ते झोनल आॅफिसर यांच्या वाहनांना ‘जीपीएस’ बसविण्यात येणार आहे. ईव्हीएम वाहून नेणाºया वाहनांना ही सिस्टीम बसविल्याने या वाहनांचे लोकेशन्स जिल्हाधिकारी कार्यालयात बसून कळणार आहे.भांडखोरांना बसणार चाप!अनेक ठिकाणी वाहने तपासताना किंवा मतमोजणीच्या ठिकाणी भांडणाचे अनेक प्रसंग उद्भवतात. प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दादागिरीही केली जाते. याआधी अशा पद्धतीने तपासणी करण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नव्हते; मात्र यावेळी या तात्पुरत्या तपासणी केंद्रांवर कॅमेरे बसविण्यात येणार असल्याने, तसेच मतमोजणीवेळी हुल्लडबाजी करणाºयांना चाप बसणार असून, या चित्रीकरणाच्या आधारे संबंधितांवर कारवाई करणे सोयीचे होणार आहे.मतमोजणीचे लाईव्ह प्रसारण रद्ददरम्यान, मतमोजणी प्रक्रियेचे लाईव्ह प्रसारण करण्याचा निर्णय भारतीय निवडणूक आयोगाने घेतला होता. घरबसल्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ही प्रक्रिया दिसण्याची व्यवस्था करण्यात येणार होती; परंतु गुरुवारीच आलेल्या आदेशानुसार हा निर्णय रद्द करण्यात आल्याचे समजते.