शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दर प्रश्नी राजारामबापूसह चार कारखान्यांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: January 6, 2015 00:46 IST

साखर नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार ऊस दर कमी करणे हा फौजदारी गुन्हा ठरत असल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा,

सांगली/आष्टा/इस्लामपूर : --एफआरपी कायद्याचा भंग करून उसाचा दर जाहीर केला आहे. राजारामबापू पाटील साखर कारखाना वाटेगाव आणि साखराळे, सर्वोदय साखर कारखाना कारंदवाडी (ता. वाळवा) आणि हुतात्मा साखर कारखाना वाळवा या कारखान्याच्या संचालक मंडळासह कार्यकारी संचालकांविरुध्द अत्यावश्यक वस्तू अधिनियमासह अन्य कलमांखाली फौजदारी गुन्हा नोंद करावा, अशा मागणीचा अर्ज आज पोलिसात दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटना व जिल्हा सुधार समितीने हा अर्ज दिला आहे.स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा, गुंडू बाबू वडेर, अ‍ॅड. अमित शिंदे (सांगली), अ‍ॅड. राहुल माळी, अ‍ॅड. अमोल हंबीरराव पाटील यांनी हा अर्ज पोलिसांकडे दिला आहे. त्यामध्ये राजारामबापू कारखाना लि., साखराळे हा नोंदणीकृत कारखाना आहे. येथे शेतकऱ्यांचा ऊस गाळप करून त्यापासून साखर व इतर उपपदार्थांची निर्मिती आणि विक्री केली जाते.सध्या साखराळे शाखेत उसाचे गाळप सुरू आहे. मात्र कारखान्याच्या संचालक मंडळ व कार्यकारी संचालकांनी चालू गळीत हंगामासाठी एफआरपीपेक्षा उसाचा दर कमी जाहीर केला आहे. साखर नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार ऊस दर कमी करणे हा फौजदारी गुन्हा ठरत असल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.आष्टा परिसरातील सर्वोदय, हुतात्मा, राजारामबापू पाटील, वाटेगाव या साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकरी व सभासदांना ऊसदर न दिल्याबद्दल त्यांच्या संचालक व कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, साखर ही अत्यावश्यक वस्तू असल्याने ती तयार करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस किती किमतीचा विकत घ्यायचा, याबाबत ऊस उत्पादकांना निव्वळ देय देणे बंधनकारक आहे. मात्र राजारामबापू पाटील सह. साखर कारखाना यांचा साखर उतारा १३.०३ इतका होता. त्यांचा एफआरपीप्रमाणे दर २५३७.६८ रुपये होतो. याप्रमाणेच हुतात्मा, सर्वोदय साखर कारखान्यांचाही दर आहे. त्यांनी तो दिला नाही. यामुळे संचालक, कार्यकारी संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संदीप राजोबा यांनी केली आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखाना परिसरातील पोलीस ठाण्यात राजोबा यांनी निवेदन व तक्रारी दिल्या आहेत. (वार्ताहर)