शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रितेशकुमार यांची बदली रद्द करा

By admin | Updated: April 16, 2015 00:23 IST

‘भाकप’च्या बैठकीत मागणी : आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

कोल्हापूर : फक्त एक वर्षाचा सेवा कार्यकाळ झाला असताना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांच्या झालेल्या अचानक बदलीमुळे सरकारची भूमिका संशयास्पद वाटत आहे. यामुळे भाकप नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास ठप्प होऊ शकतो. यासाठी रितेशकुमार यांची बदली रद्द करावी, अशी मागणी बुधवारी भाकपच्या कार्यकर्त्यांनी केली. या संदर्भात आज, गुरुवारी जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले जाणार आहे.बिंदू चौक येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांच्या अचानक झालेल्या बदलीबाबत चर्चा झाली. एक वर्षाचा कार्यकाळ झाला असतानाही त्यांची अचानक बदली होते. हे करून सरकारला गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडू द्यायचे नाही आहे का? असा प्रश्न उभा राहतो. रितेशकुमार यांच्या चांगल्या पद्धतीने आताच तपास सुरू केला आहे. यासाठी त्यांनी राज्यासह इतर राज्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन तपासाच्या दृष्टीने आपली कार्यवाही सुरू ठेवली आहे. तपासासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ पथके नेमण्यात आली आहेत. असे असताना त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे तपास ठप्प होऊ शकतो. तसेच भाकपच्या कार्यकर्त्यांनी तपासाबाबत रितेशकुमार यांच्यावर तपासाबाबत कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित न करता बदलीचीही मागणी केलेली नाही. असे असताना सरकारने अचानक केलेली बदली संशयास्पद वाटत आहे, अशा भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.या संदर्भात आज, गुरुवारी दुपारी दोन वाजता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास दोन महिने होऊनही लागलेला नाही. तो जलदगतीने होऊन मारेकऱ्यांना तातडीने पकडावे, रितेशकुमार यांचा तपास शीघ्रगतीने सुरू आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.बैठकीला दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, नामदेव गावडे, अनिल चव्हाण, एस. बी. पाटील, मिलिंद कदम, राजू यादव, सुशीला यादव, आशा कुकडे, शिवाजी शिंदे, विक्रम कदम, दिलदार मुजावर, सुभाष वाणी, उमेश पानसरे, उमेश सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.गोयल यांच्या बदलीची अडचणपानसरे हत्येचा तपास करणारे अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची काही दिवसांत पदोन्नतीवर बदली होणार आहे. त्यांची बदली झाल्यास या प्रकरणाचा तपासच कोलमडणार आहे. त्यामुळे त्यांचीही बदली रद्द व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.